-->
भातशेतीसाठी सिलिकॉन – उत्पादन वाढीचा विज्ञानाधारित मंत्र.

भातशेतीसाठी सिलिकॉन – उत्पादन वाढीचा विज्ञानाधारित मंत्र.



“जशी शरीराला झोप गरजेची, तशी भाताला गरज, सिलिकॉनची !”- डॉ. विलास येवले कृषि तज्ञ (M.Sc.Agri, P.hd.)

          कुलदिप गंधे   
"साप्ताहिक जनता की आवाज"

भंडारा :- भात (तांदूळ) हे भारतातील एक प्रमुख अन्नधान्य पीक असून त्याच्या उत्पादनात वाढ करणे ही काळाची गरज आहे. आधुनिक शेतीत उत्पादन वाढवण्यासाठी विविध खतांचा वापर केला जात असला तरी सिलिकॉनसारखे महत्त्वाचे घटक अनेकदा दुर्लक्षित राहतात. भात (तांदूळ) शेतीमध्ये सिलिकॉन (Silicon – Si) हे अत्यंत महत्त्वाचे पण अनेकदा दुर्लक्षित पोषक तत्व आहे. भातपिकामध्ये सिलिकॉनचे शोषण इतर पिकांच्या तुलनेत खूप जास्त म्हणजेच सुमारे 100 ते 300 किलो प्रति हेक्टर इतक्या मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळेच भातपिकासाठी सिलिकॉन हा “लपलेला पोषक राजा” मानला जातो. 
सिलिकॉन हे मातीमध्ये नैसर्गिकरित्या आढळणारे एक महत्त्वाचे तत्व आहे. हे जरी प्रमुख पोषक तत्त्व (NPK) नसले तरी भातासारख्या पिकांसाठी “उपयुक्त पोषक तत्व” (Beneficial Nutrient) म्हणून ओळखले ते. सिलिकॉन वनस्पतीच्या पेशींमध्ये साठून पानांवर व खोडावर एक मजबूत थर तयार करतो. त्यामुळे जापिकाची संरचना मजबूत होते आणि कीड, रोग तसेच प्रतिकूल हवामानाचा परिणाम कमी होतो. त्यामुळे पिक अधिक निरोगी व टिकाऊ बनते.

सिलिकॉनचे प्रमुख फायदे
• पिकाची आंतरिक ताकद वाढते व खोड मजबूत होऊन पिक आडवे पडत नाही
• पिकाची ताण सहन करण्याची व रोगप्रतिकारक क्षमता वाढते
• नत्र, स्फुरद व पालाश यांचे शोषण सुधारते
• भातामधील आर्सेनिकचे प्रमाण कमी करण्यास मदत होते.
• पानांमधील पाण्याचा अपव्यय कमी होतो (Water Use Efficiency) वाढते.
• दाण्यांचा दर्जा, वजन व चमक सुधारते (Market Value) वाढते.
• जमिनीतील सूक्ष्मजीवांची क्रिया सुधारते व माती सुपीक होते.
• पानांवर संरक्षणात्मक थर तयार होऊन कीड व रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो.
• दुष्काळ, उष्णता आणि ताण सहन करण्याची क्षमता वाढते
• उत्पादनात 15% ते 20% पर्यंत वाढ होऊ शकते.
• युरियासारख्या खतांची कार्यक्षमता वाढते.
सिलिकॉनचा पिकावर होणारा परिणाम
सिलिकॉनमुळे पिकामध्ये खालील सकारात्मक बदल दिसून येतात:
• पाने अधिक हिरवी, जाड व ताठ राहून प्रकाशसंश्लेषण सुधारते.
• पिकाची रोगप्रतिकारशक्ती वाढते व कीड-रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो.
• दाण्यांची गुणवत्ता, वजन व उत्पादनाची स्थिरता सुधारते.
• मातीतील उपलब्ध पोषक तत्वांचे शोषण व उपयोग अधिक कार्यक्षम होतो.
• रासायनिक खतांचा उपयोग प्रभावी होऊन खर्चात बचत होते.

पारंपरिक शेतीतील सिलिकॉनचा स्रोत
पूर्वीच्या काळात शेतकरी नकळत सिलिकॉनचा वापर करत होते.
• चुलीतील राख शेतात टाकली जात असे.
• भाताच्या अवशेषांचा (पेंढा, पळिंज) वापर केला जात असे.

भात अवशेषांमधील सिलिकॉन:
1.पेंढा: 12–16% सिलिका, 2. पळिंज (Husk): 15–20% सिलिका, 3. राख: 85–95% सिलिका
यावरून स्पष्ट होते की, भात अवशेष जाळण्याऐवजी त्यांचा पुनर्वापर केल्यास सिलिकॉनची गरज पूर्ण होऊ शकते.
सिलिकॉनचा वापर कसा करावा?
* जमिनीतून: कॅल्शियम सिलिकेट किंवा मॅग्नेशियम सिलिकेटचा वापर.
* फवारणी: सिलिसिक अॅसिड 2 मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी.
* वापरण्याची वेळ: पेरणी, लावणी किंवा टॉप ड्रेसिंग वेळी वापर अधिक प्रभावी शेतकऱ्यांसाठी फायदे
                                                               तज्ञांचे मत -डॉ. विलास येवले – कृषी तज्ञ” 
डॉ. विलास येवले हे कृषी क्षेत्रातील अनुभवी सल्लागार असून                                                                            
                                                                               त्यांना भातशेती व सिलिकॉन वापराबाबत 12–13 वर्षांचा                   
                                                                प्रत्यक्ष अनुभव आहे. त्यांनी अनेक शेतकऱ्यांच्या शेतात सिलिकॉनचा वापर करून उत्पादन वाढ, पिकाची मजबुती आणि रोगप्रतिकारशक्तीमध्ये लक्षणीय सुधारणा दाखवून दिली आहे. त्यांनी अनेक शेतांमध्ये प्रयोग करून दाखवले आहे की: पिकाची मजबुती वाढते, रोगप्रतिकारशक्ती सुधारते,उत्पादनात लक्षणीय वाढ होते.
त्यांच्या मते: “सिलिकॉन वापर हा पर्याय नाही, तर भातशेतीची गरज आहे.”
 भातशेतीमध्ये उत्पादन वाढवायचे असेल, पिक मजबूत करायचे असेल आणि खर्च कमी करायचा असेल, तर सिलिकॉनचा वापर अत्यावश्यक आहे. शेतकऱ्यांनी या तंत्रज्ञानाचा स्वीकार करून टिकाऊ आणि फायदेशीर शेतीकडे वाटचाल करावी असे मोलाचे मार्गदर्शन डॉ. विलास येवले यांनी राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन अभियान अंतर्गत मौजा खैरी बे.गावपातळीवरील प्रशिक्षणात मार्गदर्शनपर बोलत होते.

0 Response to "भातशेतीसाठी सिलिकॉन – उत्पादन वाढीचा विज्ञानाधारित मंत्र."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article