-->
कालकथित विलास केशव कांबळे यांचा पाचवा स्मृतिदिन छत्रपती प्रतिष्ठान संचलित निवासी मतिमंद कृषी कार्यशाळा शिक्रापूर येथे साजरा.

कालकथित विलास केशव कांबळे यांचा पाचवा स्मृतिदिन छत्रपती प्रतिष्ठान संचलित निवासी मतिमंद कृषी कार्यशाळा शिक्रापूर येथे साजरा.



मतिमंद मुलांना स्वावलंबी करणे लाख मोलाचे कार्य - मा उपसरपंच राजू आण्णा दरेकर

   विश्वनाथ घोडके 
"साप्ताहिक जनता की आवाज" 

शिक्रापूर :- पुणे जिल्हा पूर्वचे वंचित बहुजन आघाडीचे संघटक,पत्रकार,बौध्दाचार्य विश्वनाथ घोडके यांचे सासरे तसेच सौ पूनम विश्वनाथ घोडके यांचे वडील कालकथित विलास केशव कांबळे यांचा स्मृतिदिन श्री छत्रपती प्रतिष्ठान संचलित "निवासी मतिमंद मुलांची कृषी कार्यशाळा" शिक्रापूर येथे मुलांना अन्नदान व खाऊ वाटप करून करण्यात आला.

श्री छत्रपती प्रतिष्ठान संचलित निवासी मतिमंद मुलांची कृषी कार्यशाळेत 1)वेस्ट फुलांपासून इको फ्रेंडली होळी कलर बनविणे २) अगरबत्ती बनविणे ३) कापूर उद्योग ४) संबरणी धूप कप बनविणे ५) आकर्षक वॉल फ्रेम बनविणे६) गांडुळ खत प्रकल्प ७) पेपर बॅग बनविणे ८) धूप बनवणे असे अनेक उपक्रम मतिमंद मुलांच्या कडून राबविले जातात.अध्यक्ष शशिकांत गाडेकर सर,मुख्याध्यापक प्रशांत साळवे,अंकुश कोंढवळे,राहुल साळवे,दुर्योधन कटरे,राम गायकवाड हे सर्व पदाधिकारी मुलांची उत्तम काळजी घेतात.

यावेळी सणसवाडी नगरीचे मा उपसरपंच राजू आण्णा दरेकर यांनी इथे राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाचे कौतुक केले तसेच मतिमंद मुलांना स्वावलंबी करणे हे लाख मोलाचे कार्य आहे असे नमूद करून संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.

यावेळी सणसवाडी नगरीचे मा उपसरपंच राजू आण्णा दरेकर, तक्षशिला बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडीचे पुणे जिल्हा संघटक पत्रकार विश्वनाथ घोडके,तक्षशिला बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे ज्येष्ठ सल्लागार चंद्रकांत कांबळे,उपाध्यक्ष मोतीराम ऊर्फ बापू निकुंभ,सल्लागार विष्णू इंगळे,राहुल रायभोळे, सूरज करंकाळ,गौतम मोरे,प्रज्वल कांबळे,आप्पा कांबळे,साहिल पवार,अजित रायभोळे,दिव्यरत्न निकुंभ,पूनम घोडके,विपुल घोडके,विनीत घोडके आदी मान्यवर उपस्थितीत होते.

0 Response to "कालकथित विलास केशव कांबळे यांचा पाचवा स्मृतिदिन छत्रपती प्रतिष्ठान संचलित निवासी मतिमंद कृषी कार्यशाळा शिक्रापूर येथे साजरा."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article