एसटी प्रवास महागला.
शुक्रवार, 10 अप्रैल 2026
Comment
१५ एप्रिलपासून १०% भाडेवाड लागू.
हर्षवर्धन देशभ्रतार
"साप्ताहिक जनता की आवाज"
भंडारा/तुमसर :- ता. १० राज्य परिवहन महा मंडळाकडून (एसटी) प्रवाशांना धक्का देणारा निर्णय घेण्यात आला असून, १५ एप्रिलपासून साध्या बससेवेच्या भाड्यात १० टक्के हंगामी वाढ लागू करण्यात आली आहे. ही वाढ १५ जूनपर्यंत लागू राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
महामंडळाच्या माहितीनुसार, उन्हाळा व दिवाळी या गर्दीच्या काळात दरवर्षी भाडेवाढ केली जाते. यंदाही त्याच पार्श्वभूमीवर ही वाढ लागू करण्यात आली आहे. मात्र, ही वाढ फक्त साध्या बससेवेसाठीच असून, शिवनेरी, शिवशाही, शिवाई, हिरकणी व शयनयान यांसारख्या
भाड्यात प्रीमियम बससेवांच्या कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
दरम्यान, स्वच्छता सुधारण्यासाठी एसटीकडून महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. १५ एप्रिलपासून प्रत्येक तिकीटावर २ रुपयांचा स्वच्छता अधिभार आकारला जाणार आहे. या निधीतून बसस्थानके, बसेस व कार्यालयांची दररोज स्वच्छता करण्यात येणार
असून, लवकरच बसस्थानकांवरील स्वच्छतागृहे प्रवाशांसाठी मोफत उपलब्ध करून देण्याची तयारी सुरू आहे.
स्वच्छतेचा संपूर्ण खर्च एसटी महामंडळ स्वतः उचलणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. एसटी सोबत सुरक्षित प्रवास असा संदेश देत प्रवाशांनी या बदलांना सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
0 Response to "एसटी प्रवास महागला."
एक टिप्पणी भेजें