भावेश कोटांगले ग्रुपचे संभाजीनगर येथे लोककलेचे सादरीकरण संपन्न
बुधवार, 29 अप्रैल 2026
Comment
संजीव भांबोरे
"साप्ताहिक जनता की आवाज"
भंडारा :- महाराष्ट्र शासन महाराष्ट्र नागरी विकास अभियान संचालनालय अमृत अभियान २ च्या माध्यमातून शासकीय योजनांची माहिती पोवाडा, भारुड, गोंधळ , या लोककलेच्या माध्यमातून संगीतमय वातावरणात संभाजीनगर येथे डेमो भावेश कोटांगले व टीम यांनी कन्सेप्ट कम्युनिकेशन लिमिटेड या संस्थेमार्फत विकास रायते यांच्या नेर्तृत्वात सादर करण्यात आले.
प्रत्यक्ष सादरीकरणासाठी राज्यातून टीम आलेल्या होत्या. त्यामध्ये आमच्या संचाची निवड करून गडचिरोली ,चंद्रपूर, भंडारा,गोंदिया या जिल्ह्यात २७ एप्रिल ते 30 मे २०२६ पर्यत लोकसंगीतचे कार्यक्रम देण्यात आले. सादरीकरणामध्ये शासनाने केलेल्या कामाचा आढावा पोवाडा,भारुड ,गोंधळ यांच्या मार्फत सादर करण्यात आले.पथनाट्य टीम मध्ये भावेश कोटांगले, तेजस कोटांगले, प्रल्हाद भुजाडे, करिष्मा भाग्यवंत, अर्चना कान्हेकर, ,संदिप कोटांगले, गुरुदास राऊत,लक्ष्मीकांत बोरकर, संदिप पंचभाई यांनी कलाकृती सादर केली.
त्या प्रसंगी जनजागर संचा तर्फे कार्यक्रम समनव्यक अधिकारी विकास रायटे व क्षितिजा रायटे यांचा शाल, स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
0 Response to "भावेश कोटांगले ग्रुपचे संभाजीनगर येथे लोककलेचे सादरीकरण संपन्न "
एक टिप्पणी भेजें