आजपासून १२ मे पर्यंत उष्ण लहरी, मानवी आयुष्यात सर्वाधिक उष्ण वर्ष !.
बुधवार, 29 अप्रैल 2026
Comment
नरेंद्र मेश्राम
"साप्ताहिक जनता की आवाज"
भंडारा :- जिल्ह्यासह संपूर्ण परिसरात येत्या २९ एप्रिल ते १२ मे दरम्यान तीव्र उष्णतेची लाट येण्याचा इशारा देण्यात आला असून नागरिक संरक्षण महासंचालनालयाने "हाय अलर्ट" जारी केला आहे. सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत तापमान ४५ ते ५५ दरम्यान जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तूर्तास पारा ४४ च्या घरात आहे. त्यामुळे या कालावधीत शक्यतो घराबाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. आरोग्याची काळजी घ्या उष्णतेमुळे घुसमट, चक्कर येणे किंवा तब्येत बिघडल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घ्यावा. घरामध्ये योग्य वायुवीजन ठेवण्यासाठी दरवाजे खिडक्या उघड्या ठेवाव्यात. नागरिकांनी पुरेसे पाणी, ताक, दही, बेलफळाचा रस यांसारख्या थंड पेयांचे
सेवन करावे, असा आरोग्य सल्ला देण्यात आला आहे.
वाहनधारकांना सूचना दरम्यान, उष्णतेच्या वाढत्या तीव्रतेमुळे वाहनांमध्ये ठेवलेल्या काही वस्तूंमुळे धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे गॅस साहित्य, लाईटर, परफ्यूम, कार्बोनेटेड पेये व बॅटरी असलेली उपकरणे वाहनातून काढून टाकावीत. वाहनाच्या खिडक्या किंचित उघड्या ठेवून वायुवीजन करावे तसेच टायरमध्ये जास्त हवा भरू नये. श्वापदापासून सावधान उष्णतेमुळे साप व विंचू थंड जागेच्या शोधात घराजवळ येण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहावे. घरात काळजी घ्या गॅस सिलिंडर उन्हात ठेवू नये, वीजमीटरवर अतिरिक्त भार टाळावा आणि
एसीचा वापर मर्यादित ठेवावा, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. प्रशासनाने नागरिकांना विशेषतः दुपारच्या वेळेत थेट सूर्यप्रकाश टाळण्याचे आवाहन केले असून, स्वतःची व कुटुंबाची काळजी घेण्याबरोबरच ही माहिती इतरांपर्यंत पोहोचवण्याचेही आवाहन केले आहे. येलो अलर्ट आजपासून पुढचे तीन दिवस जिल्ह्यात अवकाळी पावसासह विजांच्या कडकडाट व काही ठिकाणी गारांचा पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. सर्वाधिक उष्ण वर्ष मानवी आयुष्यात २०२६ वर्ष सर्वाधिक उष्ण म्हणून पुढे येत आहे. वृक्षकत्तल , सिमेंटीकरण व शहरीकरण असे मुख्य कारण उष्ण राहण्याचे सबब पुढे येत आहे.
0 Response to "आजपासून १२ मे पर्यंत उष्ण लहरी, मानवी आयुष्यात सर्वाधिक उष्ण वर्ष !."
एक टिप्पणी भेजें