भंडारा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) अंतर्गत ओव्हरब्रिज (बोगदा )उभारण्याची मागणी.
गुरुवार, 23 अप्रैल 2026
Comment
"साप्ताहिक जनता की आवाज"
वृत्तपत्र प्रतिनिधी
भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ.प्रशांत पडोळे यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी अनेकदा केली. NHAI चे अधिकारी त्यावेळी उपस्थित होते. स्थानिक नागरिकांशी संवाद साधताना त्यांनी अनेक अडचणी जाणून घेतल्या. सध्या सिंघोरी फाट्यावरून भंडारा येथे जाण्यासाठी मोठा वळसा घ्यावा लागतो, त्यामुळे वेळ व इंधनाचा अपव्यय होत आहे, तसेच अपघातांची शक्यता वाढते.
यापूर्वीही येथे गंभीर अपघात झालेले असूनही NHAI अधिकाऱ्यांकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. संबंधित अधिकारी नेहमीच कानाडोळा करत असल्याचा आरोपही स्थानिकांनी केला आहे.
या पार्श्वभूमीवर, पलाडी येथे तातडीने ओव्हरब्रिज उभारण्यात यावा, अशी मागणी नागरिकांनी माझ्याकडे अनेकदा केली असून, यावर लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घ्या असे अनेकदा NHAI चे अधिकारी, जिल्हाधिकारी भंडारा यांना तसे लेखी पत्र दिले असून निर्देश पण दिले आहेत.
NHAI चे अधिकारी आता नागरिकांच्या जीवावर उठले आहेत. भिलेवाडा नंतर पूल नंतर पलाडी ता.भंडारा ओव्हर ब्रीज (बोगदा) तात्काळ सुरुवात करण्यात अन्यथा खबरदार....
यावेळी परिसरातील नागरिक प्रफुल रामटेके, (सामाजिक कार्यकता ) राजकुमार लोणारे, लक्ष्मण बारापात्रे, विशांत श्यामकुवर, सुनील ढोमणे, बंटी ठवरे, धम्मपाल पंधरे, अजित नेवारे, संजय उईके, महेंद्र चमलाटे, मोहन मानकर, उद्देश वासनिक, दिपक गोस्वामी, राजेश गोस्वामी, पंकज गोस्वामी, आणि पलाडी, टेकेपार येथील नागरिक उपस्थित होते.
0 Response to " भंडारा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) अंतर्गत ओव्हरब्रिज (बोगदा )उभारण्याची मागणी."
एक टिप्पणी भेजें