सरस्वती विद्यालयाची दैदिप्यमान कामगिरी ;वारीया जिल्ह्यातुन तृतीय क्रंमाक पटकावत राखली गुणवत्तापूर्वक निकालाची परंपरा.
शनिवार, 9 मई 2026
Comment
"साप्ताहिक जनता की आवाज"
वृत्तपत्र प्रतिनिधी
अर्जुनी/मोर :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या फेब्रुवारी/मार्च 2026 मध्ये घेण्यात आलेल्या शालांत परीक्षेचा निकाल दिनांक 8 मे 2026 रोज शुक्रवारला जाहीर करण्यात आला.अर्जुनी/मोरगाव येथील सरस्वती विद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागला असून परिणीता नाकाडे व वारिया मुरकुटे यांनी संयुक्तपणे 97.40 टक्के गुण घेऊन जिल्हातुन द्वितीय व विद्यालयातून प्रथम तसेच चैतन्य डोंगरवार याने 96.60 टक्के गुण घेऊन तालुक्यातून तृतीय व विद्यालयातून द्वितीय क्रमांक येण्याचा बहुमान पटकाविलेला आहे. सदर विद्यालयातून एकूण 172 विद्यार्थी परीक्षेमध्ये प्रविष्ट झालेले होते त्यात शाळेतून 21 विद्यार्थी 90 टक्केवारी पेक्षा जास्त गुण घेऊन यश प्राप्त केलेले आहे, तर विशेष प्राविण्यश्रेणीत 78 विद्यार्थी, प्रथम श्रेणीत 50 विद्यार्थी व पास श्रेणीत 23 विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत. यावर्षी माध्यमिक शिक्षक मंडळाने राबविलेला कॉपीमुक्त अभियान व गुगल मॅप द्वारे घेण्यात आलेल्या परीक्षा यामुळे सर्वाचे लक्ष निकालाकडे लागलेले होते असे असतानाही दरवर्षीप्रमाणे सरस्वती विद्यालयाने आपली यशाची परंपरा कायम राखलेली आहे.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष बल्लभदास भुतडा, संस्थासचिव सर्वेश भुतडा, कोषाध्यक्ष जयप्रकाश भैया,प्राचार्य जे.डी. पठाण, उपप्राचार्या अर्चना गुरनुले, पर्यवेक्षक शिवचरण राघो॔ते,जी.एम.बी. विद्यालयाच्या प्राचार्या शव्या जैन,समन्वयक भगीरथ गांधी, महेश पालीवाल यांच्यासह सर्व शिक्षक वृद्ध व कर्मचाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन कौतुक केले.
0 Response to "सरस्वती विद्यालयाची दैदिप्यमान कामगिरी ;वारीया जिल्ह्यातुन तृतीय क्रंमाक पटकावत राखली गुणवत्तापूर्वक निकालाची परंपरा."
एक टिप्पणी भेजें