-->
अखिल भारतीय ओबीसी बहुजन महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी गोंदिया जिल्हाध्यक्ष मा. गणेश भाऊ पारधी यांचे ९ जून रोजी भंडारा जिल्ह्यात आगमन.

अखिल भारतीय ओबीसी बहुजन महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी गोंदिया जिल्हाध्यक्ष मा. गणेश भाऊ पारधी यांचे ९ जून रोजी भंडारा जिल्ह्यात आगमन.


संजीव भांबोरे 
"साप्ताहिक जनता की आवाज" 

 भंडारा :- प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस तथा दैनिक माझा मराठवाडा चे विदर्भ संपादक संजीव भांबोरे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त ९ जून रोजी भंडारा जिल्ह्यात भव्य सत्कार व सामाजिक एकात्मता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या विशेष कार्यक्रमाला अखिल भारतीय ओबीसी बहुजन महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे गोंदिया जिल्हाध्यक्ष मा. गणेश भाऊ पारधी हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी सातत्याने आवाज उठविणारे, सामाजिक न्यायासाठी संघर्ष करणारे तसेच युवकांमध्ये नेतृत्व निर्माण करणारे युवा नेतृत्व म्हणून मा. गणेश भाऊ पारधी यांची संपूर्ण विदर्भात विशेष ओळख निर्माण झाली आहे. त्यांच्या कार्याचा प्रभाव सामाजिक व राजकीय क्षेत्रात मोठ्या प्रमाणात दिसून येत असून त्यांच्या आगमनामुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

सदर कार्यक्रमात सामाजिक, राजकीय, पत्रकारिता, शैक्षणिक, कला व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात येणार आहे. कार्यक्रमास विविध जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, युवक, राजकीय पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली आहे.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने सामाजिक ऐक्य, युवक नेतृत्व, ओबीसी समाजाचे प्रश्न व समाजहिताच्या विविध विषयांवर सकारात्मक चर्चा घडून येणार असल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे. कार्यक्रमाच्या तयारीला वेग आला असून भंडारा जिल्ह्यात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

0 Response to "अखिल भारतीय ओबीसी बहुजन महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी गोंदिया जिल्हाध्यक्ष मा. गणेश भाऊ पारधी यांचे ९ जून रोजी भंडारा जिल्ह्यात आगमन."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article