-->
    निकृष्ट सिमेंट रस्ता कामाची होणार चौकशी.

निकृष्ट सिमेंट रस्ता कामाची होणार चौकशी.

 

                दिगंबर देशभ्रतार 
      "साप्ताहिक जनता की आवाज" 

• जिल्हाधिकाऱ्यांमार्फत त्रिस्तरीय चौकशी समिती गठीत‌.

तुमसर :- शहरातील प्रभाग क्र. ११, दुर्गा नगर भागात झालेल्या अत्यंत निकृष्ट दर्जाच्या सिमेंट रस्ता बांधकामाची प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. स्वराज्य युवा एकता फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अमित मेश्राम यांच्या

करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

तक्रारीची दखल घेत भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नगरपालिका प्रशासन विभागाने या कामाची सखोल चौकशी करण्यासाठी एक त्रिस्तरीय चौकशी समिती गठीत केली आहे. या समितीला अवघ्या ७ दिवसांत आपला चौकशी अहवाल सादर

तुमसर शहरातील प्रभाग क्र. ११, दुर्गा नगर येथील राजेंद्र बिसने ते राकेश कामथे यांच्या घरापर्यंत सुमारे १४० मीटर लांबीच्या सिमेंट रस्त्याचे बांधकाम करण्यात आले आहे. परंतु, हे बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले असून, यात मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार आणि तांत्रिक त्रुटी असल्याचा आरोप जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रारीद्वारे केला होता. या रस्त्याची चौकशी करून दोषी कंत्राटदार आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी

त्यांनी केली होती.

सामाजिक कार्यकर्ते अमित मेश्राम यांच्या तक्रार पत्राची तातडीने दखल घेत, भंडारा जिल्ह्याचे जिल्हा सह-आयुक्त (नगरपालिका प्रशासन) चंदन पाटील यांनी १५ मे २०२६ रोजी अधिकृत आदेश जारी करून चौकशी समिती स्थापन केली आहे. सदर चौकशी समितीमध्ये आशिष घोडे (मुख्याधिकारी, नगर पंचायत लाखनी), अध्यक्ष, मंगेश लाडे (स्थापत्य अभियांत्रिकी सेवा, नगर परिषद भंडारा), सदस्य, तुषार देविदास भगत (स्थापत्य अभियांत्रिकी सेवा, नगर पंचायत लाखनी), सदस्य या अधिकाऱ्यांचा

समावेश आहे.

जिल्हा सह-आयुक्तांनी आदेशात स्पष्ट केले आहे की, या समितीने तातडीने घटनास्थळी जाऊन कामाची प्रत्यक्ष पाहणी, तांत्रिक तपासणी आणि चौकशी करावी. या चौकशीचा संपूर्ण अनुपालन अहवाल पुढील ७दिवसांच्या आत जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर करणे बंधनकारक आहे. जर या चौकशी कार्यात कोणत्याही अधिकाऱ्याने हयगय किंवा टाळाटाळ केल्यास, त्यांच्यावर थेट शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित केली जाईल, असा कडक इशाराही प्रशासनाने दिला आहे.

0 Response to " निकृष्ट सिमेंट रस्ता कामाची होणार चौकशी."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article