कंट्रोलर बॉक्स चोरीला, ९ महिन्यानंतरही शेतकऱ्याला मिळाला नाही! सोध घेण्यात यंत्रणा अपयशी..
गुरुवार, 7 मई 2026
Comment
नरेंद्र मेश्राम
"साप्ताहिक जनता की आवाज"
भंडारा :- लाखनी तालुक्यातील पालांदुर पोलिस ठण्यांतर्गत येत असलेल्या खूनारी येथील सोलरपंपचा कंट्रोलर बॉक्स चोरीला, ९ महिन्यानंतरही शेतकऱ्याला मिळाला नाही! विमा असून उपयोग काय? हंगाम नुकसानीत प्रभावित शेतकरी संकटात!कंपनीचा खोडसाळपणा उघड पालांदूर शासन व वीज विभागाच्या मध्यस्थीने शेतकऱ्याला सौरऊर्जा योजना बंधनकारक केली आहे. यात शेतकऱ्याला वर्षभर नियमित सेवा मिळण्याकरिता कंपनी साहित्याचा विमा काढतो. त्यातून तीन महिन्यात साहित्य चोरीला जाणे किंवा काही बिघड आल्यास त्याची भरपाई करून देणे कंपनीला करारानुसार बंधनकारक असते. मात्र ९ महिने लोटून सुद्धा ओसवाल कंपनीने कंट्रोल बॉक्स पूर्वीला नाही. हेमंतकुमार यशवंत शेलोकर खुनारी असे प्रभावित शेतकऱ्याचे नाव आहे. फेब्रुवारी २०२५ ला वीज विभागाच्या मध्यस्थीने सोलर पंप लावण्यात आला.१९ ऑगस्टला अज्ञात चोरट्याने शेतात लावलेला कंट्रोल बॉक्स चोरून नेला. कंपनीला कळविण्यात आले. त्यांच्या सूचनेनुसार स्थानिक पोलीस स्टेशनला तक्रार सुद्धा नोंदविली. सर्व प्रक्रिया केल्यानंतर तीन महिन्यात कंट्रोल बॉक्स देऊ असे कंपनीच्या वतीने कळविण्यात आले. मात्र तब्बल ९ महिने लोटून सुद्धा कंपनीने कंट्रोलर बॉक्स पूर्वीला नसल्याने शेतकरी सिंचनाकरिता तळमळ करीत आहे. शेतातील कंट्रोल बॉक्स चोरीला जाऊन ९ महिने आटोपले. कंपनीने सुरुवातीला प्रतिसाद दिला. तीन महिन्यात बदलवून देण्याच्या शब्द सुद्धा दिला. मात्र त्यानंतर शेतकऱ्याचा संपर्क नंबर काळया यादीत टाकून संपर्क बंद केला. वीज अधिकाऱ्यांची मध्यस्थी सुद्धा फोल... प्रभावित शेतकऱ्याने वीज कार्यालयात समस्या मांडली. अधिकाऱ्यांनी सुद्धा सदर कंपनीशी संपर्क केला. पुन्हा त्यांना प्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. शेतकऱ्यांनी पुन्हा तीच प्रक्रिया केली. तरीही कंपनीने अजूनही कंट्रोल बॉक्स पूर्वीला नाही. एकाच तारखेला लगतच्या शेतातील कंट्रोल बॉक्स दुसऱ्या कंपनीचा चोरीला गेला होता. या कंपनीने करारानुसार तीन महिन्यात सदर शेतकऱ्याला नियमित सेवा दिली. मात्र ओसवाल कंपनीने ९ महिने आटोपूनही सेवा न पुरविल्याने ओसवाल कंपनीच्या विरोधात शेतकरी आक्रमक आहेत. वीज विभागाने सदर कंपनीशी संपर्क करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी प्रभावीत शेतकरी हेमंत सेलोकर यांनी केली आहे.
0 Response to "कंट्रोलर बॉक्स चोरीला, ९ महिन्यानंतरही शेतकऱ्याला मिळाला नाही! सोध घेण्यात यंत्रणा अपयशी.."
एक टिप्पणी भेजें