-->
विदर्भात उष्णतेचा दाह; भंडारा-गोंदिया येथे पारा ४७.१ अशांवर.

विदर्भात उष्णतेचा दाह; भंडारा-गोंदिया येथे पारा ४७.१ अशांवर.

• रविवारपर्यंत विदर्भात उष्णतेच्या लाटेसदृश्य स्थितीचा अंदाज.

"साप्ताहिक जनता की आवाज"
 न्यूज नेटवर्क 

भंडारा/तुमसर :- राज्यातील विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये मागील काही दिवसांपासून उष्णतेची लाटेसदृश्य स्थिती कायम असून यामुळे या प्रदेशातील नागरिकांना तीव्र उष्णतेचा त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान, ही स्थिती रविवारपर्यंत कायम राहील, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकण प्रदेशात पुढील पाच दिवसांत कमाल तापमानात २ ते ३ अंशांनी घट होईल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. या प्रदेशातील नागरिकांना तीव्र उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळेल असा अंदाज आहे.
राज्यात सध्या काही भागात वादळी पावसाची नोंद होत असून विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाटेसदृश्य स्थितीची नोंद होत आहे. तसेच या प्रदेशात सध्या सरासरी कमाल तापमानाहून ४ ते ५ अंश सेल्सिअस अधिक तापमानाची नोंद होत आहे. दरम्यान, विदर्भातील भंडारा-गोंदिया येथे बुधवारी ४५.३अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. जे सरासरी कमाल

तापमानाहून ४.८ अंशांनी अधिक नोंदले गेले, तर मंगळवारीही येथे ४६.३ अंश सेल्सिअस कमाल नोंद झाली होती. तसेच नागपूर ४६.६, अमरावती ४६.४, चंद्रपूर ४६.२, गडचिरोली ४५.६, तर यवतमाळ येथे ४५.२ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदले गेले. दरम्यान, गुरुवारी विदर्भातील अकोला, अमरावती, वर्धा येथे 'रेड अलर्ट', तर चंद्रपूर, नागपूर आणि यवतमाळ येथे उष्णतेचा 'ऑरेंज अलर्ट' देण्यात आला आहे.
दक्षिण मध्य महाराष्ट्रातील कमाल तापमानात बुधवारपासून लक्षणीय घट झाली असून या प्रदेशातील कोल्हापूर आणि कोल्हापूर घाट विभाग येथे पावसाळी हवामान आहे. काही दिवसांपूर्वी या प्रदेशातील जळगावसह इतर जिल्ह्यात उष्णतेची लाटेसदृश्य स्थितीची नोंद होत होती. यामुळे या प्रदेशातील नागरिकांना तीव्र उन्हापासून दिलासा मिळाला आहे. दरम्यान, गुरुवारी कोल्हापूर आणि कोल्हापूर घाट विभाग येथे पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली.

कोकण प्रदेशातील कमाल तापमानात घट होणार.

मुंबई शहर आणि उपनगरात सध्या उकाड्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. तसेच पहाटे आणि संध्याकाळी शहरात ढगाळ हवामान दिसून येत आहे. दरम्यान, बुधवारी हवामान केंद्राच्या सांताक्रूझ केंद्रात ३४ अंश सेल्सिअस, तर कुलाबा केंद्रात ३४.४ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. सांताक्रूझ येथे २७.२ आणि कुलाबा येथे २६.८ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदले गेले. तसेच शुक्रवारी शहरात ३३ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २७ अंश सेल्सिअस राहील, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मुंबईसह कोकण पट्ट्यात पुढील पाच दिवसांत कमाल तापमानात घट होईल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. यामुळे कोकणवासीयांना तीव्र उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळेल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, गुरुवारी सिंधुदुर्ग येथे हवामान विभागाकडून पावसाचा 'यलो अलर्ट' देण्यात आला असून रत्नागिरी, रायगड आणि ठाणे जिल्ह्यांत हलक्या सरींची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

मोसमी पावसाची वाटचाल.

राज्यात उष्णतेमुळे नागरिक मेटाकुटीला आले असून सध्या राज्यवासीयांना पावसाचे वेध लागले आहेत. दरम्यान, मोसमी पाऊस पुढील ३ ते ४ दिवसात आग्नेय अरबी समुद्राच्या काही भागांमध्ये तसेच कोमोरीन क्षेत्र, नैऋत्य आणि आग्नेय बंगालच्या उपसागर तसेच अंदमान समुद्राच्या उर्वरित भागात दाखल होण्यास अनुकूल स्थिती आहे. अशी माहिती हवामान विभागाने बुधवारी दिली असून २६ मेच्या आसपास मोसमी पाऊस केरळात दाखल होण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.

0 Response to "विदर्भात उष्णतेचा दाह; भंडारा-गोंदिया येथे पारा ४७.१ अशांवर."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article