-->
महिला अधिकार सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य लाखांदूर आक्रमक !.

महिला अधिकार सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य लाखांदूर आक्रमक !.


• "अल्पवयीन मुलींवरील अत्याचार थांबवा; दोषींना फाशी द्या"

• मुख्यमंत्री ते पोलीस प्रशासनाला धडक निवेदन; कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा.

"साप्ताहिक जनता की आवाज"
वृत्तपत्र प्रतिनिधी 
 
लाखांदूर :- राज्यासह ग्रामीण भागांत अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचार, बलात्कार व हत्या यांच्या वाढत्या घटनांमुळे समाजमन संतप्त झाले असून, या अमायुष घटनांविरोधात महिला अधिकार सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य लाखांदूर आक्रमक झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. "निष्पाप चिमुकल्यांवरील अत्याचार थांबवा, दोषींना कठोर शिक्षा द्या" अशा संतत भावना व्यक्त करत संघटनेच्या वतीने प्रशासनाला धडक निवेदन देण्यात आले.

गेल्या काही दिवसांत तीन ते चार वर्षाच्या निष्पाप मुलींवर अत्याचार करून हत्या करण्याच्या तसेच अल्पवयीन मुलींना गर्भवती करण्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. या घटनांनी संपूर्ण राज्य हादरले असून महिलांमध्ये तीव्र असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. शासन व प्रशासन या गंभीर घटनांकडे अपेक्षित गांभीर्याने पाहत नसल्याचा आरोप करत संघटनेच्या पदाधिकान्यांनी संताप व्यक्त केला.

महिला अधिकार सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य लाखांदूरच्या वतीने तहसीलदार लाखांदूर यांच्या मार्फत मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, खासदार, आमदार, पोलीस स्टेशन लाखांदूर तसेच महिला व बालविकास विभाग यांना निवेदन सादर करण्यात आले.

यावेळी महिला अधिकार सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्यांचे विदर्भ कार्याध्यक्ष निरूताई मेश्राम व पूर्व विदर्भ अध्यक्षा ज्योतीताई रामटेके यांनी लाखांदूरचे तहसीलदार यांच्याशी सविस्तर चर्चा करत राज्यातील वाढत्या अत्याचारांच्या घटनांबाबत तीव्र चिंता व्यक्त केली.

तसेच पीडित मुलींना त्वरित न्याय मिळावा व आरोपींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली.

"जर या गंभीर विषयांवर तात्काळ कठोर कारवाई झाली नाही, तर महिला अधिकार सामाजिक संघटना महाराष्ट्र

संघटनेच्या महत्वाच्या मागण्या.

१) आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करावी.

२) सर्व प्रकरणांची फास्ट ट्रॅक न्यायालयात सुनावणी करून पीडितांना त्वरित न्याय मिळवून द्यावा.

३) दोषींना फाशी किंवा जन्मठेपेची शिक्षा द्यावी.

४) अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेसाठी विशेष मोहिम राबवावी.

५) प्रत्येक जिल्हा व तालुक्यात महिला व बाल संरक्षण पथक सक्षम करावे.

६) शाळा व गावपातळीवर सुरक्षा व्यवस्था मजबूत करावी.

राज्य लाखांदूरच्या वतीने राज्यभर लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल," असा इशारा संघटनेने प्रशासनाला दिला.

या निवेदनावेळी जिल्हा महासचिव बिंदुताई शनिराम रामटेके (दहेगाव), तालुका उपाध्यक्ष वैशाली विवेक हांडगे, तालुका सहसचिव वनश्री चंद्रहास चव्हाण, सदस्य सविता लेदे व मंदिराताई कोरे.

0 Response to "महिला अधिकार सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य लाखांदूर आक्रमक !."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article