-->
राजधानी च्या पत्रकारांना बनावट नियुक्ती पत्र व आयडी वाटप?.

राजधानी च्या पत्रकारांना बनावट नियुक्ती पत्र व आयडी वाटप?.

• जिवणरावांचा संस्थापक अध्यक्षाचा मोह आवरेना, चेतुची मात्र चुप्पी.

                   सोनु संजीव क्षेत्रे 
        "साप्ताहिक जनता की आवाज" 
          
 उल्हासनगर :- स्वयंघोषित आणि स्वतःला पत्रकारांची राजधानी संघटना म्हणून घेणाऱ्या एका पत्रकार संघटनेतील पदाधिकाऱ्यांनी  बनावट नियुक्तीपत्र व आयडी वाटप केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे , धर्मादाययुक्त कार्यालयात नोंदणी अर्जांला व संस्थेच्या घटनेला केराची टोपली दाखवत सदर ऐका राजधानी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सचिव झाले आहेत तर सचिव असणारे संस्थापक अध्यक्ष झाल्याची झाल्याची चिंताजनक बाब उघडकीस आली आहे 
    सचिवांना संस्थापक अध्यक्ष होण्याचा मोह न  आवरल्याने मूळ संस्थेचे अर्जदार व संस्थापक अध्यक्ष यांनी चुप्पी साधत बनावट दिले जाणाऱ्या नियुक्ती पत्रांना एक प्रकारे प्रोत्साहन दिले आहे का याबाबत उलट सुलट चर्चा रंगु लागली आहे यामुळे अनेक पत्रकारांची बनावट निवड झाल्याची बाब निदर्शनास आली आहे ,
  शिक्षकांनी पत्रकारिता करू नये या संदर्भात नागपूर खंडपीठाने अनेकदा निर्देश दिले असतानी तसेच 
महाराष्ट्र नागरी सेवा वर्तवणुक नियम १९७९ मध्ये नियम क्र ९ मध्ये शिक्षकांनी वृत्तपत्रे व आकाशवाणी यांच्यापासून संपर्क ठेवण्यासाठी प्रतिबंध केले असतानाही
 याच संस्थेचे उपाध्यक्ष यांनी प्रशासनाची फसवणूक करत ऐका मोठ्या वृत्तपत्रात पत्रकार म्हणून मिरवताना दिसतात विशेष म्हणजे यांनी शिक्षक असल्याची माहितीही लपवल्याची चर्चा सध्या रंगु लागली आहे
 या बहाद्दर शिक्षकाविरोधात अन्सार शेख यांनी सातारा शिक्षण विभागाकडे तक्रार दाखल केली असून सदर प्रकरणाची  चौकशी प्रशासनामार्फत सुरु आहे, बनावट नियुक्त पत्र देऊन पत्रकारांना फसवल्याप्रकरणी काही पत्रकार पोलीस ठाण्यात दाद मागणार असल्याची चर्चा सध्या रंगु लागली आहे

0 Response to "राजधानी च्या पत्रकारांना बनावट नियुक्ती पत्र व आयडी वाटप?."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article