-->
“गीतेचा कर्मयोग आणि श्रीचक्रधर" प्रभूंचा स्मरणमार्ग - ‘भेटीतून देवत्वाचा अनुभव’ देणारा अपूर्व भेटकाळ सोहळा.

“गीतेचा कर्मयोग आणि श्रीचक्रधर" प्रभूंचा स्मरणमार्ग - ‘भेटीतून देवत्वाचा अनुभव’ देणारा अपूर्व भेटकाळ सोहळा.


"साप्ताहिक जनता की आवाज"
 वृत्तपत्र प्रतिनिधी 

डोमेग्राम/अहिल्यानगर :- अपूर्व भेटकाळ सोहळा समिती, महाराष्ट्र राज्य तसेच श्रीप्रभु प्रतिष्ठान, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “अपूर्व भेटकाळ सोहळा – वासनिकांचा पर्व चौथे” हा भव्य आणि प्रेरणादायी सोहळा श्रीक्षेत्र छिन्नस्थळी, डोमेग्राम येथे दिनांक २ व ३ मे २०२६ रोजी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेल्या नामधारक वासनिकांच्या साक्षीने उत्साहात पार पडला...

या सोहळ्यात श्रीमद्भगवद्गीता आणि सर्वज्ञ श्रीचक्रधर प्रभू यांच्या शिकवणीवर आधारित स्मरण, आचरण आणि निःस्वार्थ सेवाभाव या जीवनमूल्यांचा प्रभावी संदेश देण्यात आला...

 उद्घाटन सोहळा आणि आध्यात्मिक प्रारंभ

या कार्यक्रमाचे उद्घाटन अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे अध्यक्ष तथा कवीश्वर कुळाचार्य श्रद्धेय प.पू.प.म. आचार्य श्री मोहनराज कारंजेकर बाबा (अमरावती) यांच्या शुभहस्ते पार पडले. यावेळी प.पू.प.म. श्री अनेराज बाबा बिडकर (श्रीरामपूर) यांची प्रमुख उपस्थिती लाभली...

पहाटे पाच वाजता सर्व वासनिक बंधू-भगिनींनी श्रीक्षेत्र छिन्नस्थळी येथे जाऊन सामूहिक स्मरण केले. त्यानंतर मान्यवरांच्या आगमनावेळी स्थानावर विडा व पुष्पहार अर्पण करण्यात आले तसेच गुंफा स्थळावरही वंदन करण्यात आले...

यानंतर प्रमुख मान्यवर व वासनिकांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली...

 सत्कार, मार्गदर्शन आणि अनुभवांची देवाणघेवाण

यावेळी आचार्य श्री मोहनराज कारंजेकर बाबा यांचा वासनिकांच्या वतीने सत्कार करण्यात आला. आपल्या मार्गदर्शनात त्यांनी स्मरण आणि आचरण यांचे महत्त्व सांगत वासनिकांच्या जबाबदारीची जाणीव करून दिली...

तसेच सातारा येथील त. समृद्धी ताई बिडकर यांचा मार्गदर्शक व तत्त्वज्ञान अभ्यासक म्हणून सन्मान करण्यात आला...

यानंतर आरती व महाप्रसादाचे आयोजन झाले. दुपारच्या सत्रात उपस्थित वासनिकांनी एकमेकांना सुपारी देऊन भेटकाळ सोहळा पार पाडला...

यावेळी वासनिक बंधू भगिनीं यांनी आपले अनुभव मांडत आध्यात्मिक विचारांची देवाणघेवाण केली...

सायंकाळी श्रीरामपूर येथील आचार्य श्री घुग्गे महानुभाव यांच्या पिढीची देवपूजा वंदन करण्यात आले व त्यानंतर भोजनाचा कार्यक्रम पार पडला...

 दुसऱ्या दिवशी सेवा, स्वच्छता आणि साधना

दुसऱ्या दिवशी पहाटे तीन वाजता स्मरण व पहाटे पाच वाजता डोमेग्राम येथील राजमठात स्थान वंदन करण्यात आले. त्यानंतर नदीपात्रातील स्थान वंदन सामूहिकरित्या करण्यात आले...

या दिवशी विशेष सेवा उपक्रम राबविण्यात आला. प.से. संदीप साळुंके, गणेश शेळके, प्रवीण बोडके, सुरेश डोळसे यांनी नदीपात्रातील कचरा, काटेरी झुडपे व पाण्यातील अडथळे हटवून परिसर स्वच्छ केला...

तसेच श्रीक्षेत्र छिन्नस्थळी डोमेग्राम येथील गुंफा मंदिर परिसरातील स्वच्छतागृह व परिसर स्वच्छ करण्यासाठी सर्व वासनिकांनी एकत्रित प्रयत्न केले...

यानंतर आचार्य श्री मराठे बाबा (टाकळी) यांच्या पिढीची देवपूजा वंदन करण्यात आले...

 समारोप सत्रात मार्गदर्शन आणि सन्मान

समारोप सत्रात सालवाडी येथील पारिमांडल्य कुलभूषण श्रद्धेय आचार्य श्री तळेगावकर बाबा शास्त्री तसेच प.पू.प.म. श्री प्रेममुनी दादा पंत (श्रीरामपूर) यांचे आगमन झाले. त्यांचे स्वागत करून द्वय साधकांचा यथोचित सत्कार करण्यात आला...

त. उज्ज्वला ताई तळेगावकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर श्री प्रेममुनी दादा पंत तसेच अध्यक्ष म्हणून आचार्य श्री तळेगावकर बाबा शास्त्री यांनी उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले...

या प्रसंगी सर्व उपस्थित नामधारक वासनिकांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले...

 कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प.से. गणेश शेळके यांनी केले तसेच आभार प्रदर्शनही त्यांनीच मानले. प्रस्तावना सुरेश डोळसे यांनी मांडली, तर रूपरेषा धनंजय कदम, प्रवीण बोडके, संदीप साळुंके यांनी सादर केली. सन्मानपत्र वाचन प.सेविका धनश्री सुतार यांनी केले...

इतर सर्व सदस्यांनी “हा सोहळा आपला आहे” या भावनेतून एकजुटीने कार्य करत हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले...

 अध्यात्म आणि सेवेचा संदेश.

या सोहळ्यातून श्रीमद्भगवद्गीता चा कर्मयोग आणि सर्वज्ञ श्रीचक्रधर प्रभू यांचा स्मरण व आचरण मार्ग यांचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला.

महानुभाव परंपरेतील वचन —

“भ्रमत भ्रमता भेटी की आपजोनी भेटी,

एकमेका भेटलीया भेटीचा पाडू जाय,

तुमच्या भेटीत देव भेटो...

या वचनाचा प्रत्यय या सोहळ्यात स्पष्टपणे जाणवला. विविध ठिकाणांहून आलेल्या वासनिकांच्या या भेटीत केवळ परस्परांचा नव्हे, तर देवत्वाचा अनुभव मिळाला...

“सेवा हीच साधना आणि आचरण हीच खरी भक्ती” हा संदेश प्रत्यक्ष कृतीतून देत हा सोहळा वासनिकांसाठी प्रेरणादायी आणि स्मरणीय पर्व ठरला...

दंडवत माझा देव श्रीचक्रधर...

*प से सुरेश सरूबाई देवराम डोळसे नाशिक*
*मो नंबर ९४२२७६२९१४*

0 Response to "“गीतेचा कर्मयोग आणि श्रीचक्रधर" प्रभूंचा स्मरणमार्ग - ‘भेटीतून देवत्वाचा अनुभव’ देणारा अपूर्व भेटकाळ सोहळा."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article