मालेगाव येथे शितल नागदेवे राज्यस्तरीय शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित.
शनिवार, 2 मई 2026
Comment
संजीव भांबोरे
"साप्ताहिक जनता की आवाज"
नाशिक :- जिल्ह्यातील मालेगाव येथे राज्यस्तरीय विविध क्षेत्रात सामाजिक राजकीय पत्रकारिता आरोग्य व विविध क्षेत्रात ज्यांचा योगदान आहे अशा सामाजिक कार्यकर्त्यांना राज्यस्तरीय शिवछत्रपती पुरस्कार सन्मान सोहळा मालेगाव जिल्हा नाशिक येथे आयोजित करण्यात आला होता भंडारा जिल्ह्यातील सामाजिक व पत्रकाराचा क्षेत्रातील एशियन न्यूज चॅनेल न्यूज अँकर शीतल अतुल नागदेवे यांना राज्यस्तरीय शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच भंडारा जिल्ह्यातील कला व सामाजिक क्षेत्रात असलेले सुवर्णमाला गजभिये यांना सुद्धा सन्मानित करण्यात आले.
शिवछत्रपती पुरस्कार अनेक सामाजिक कार्यकर्त्यांच्या सत्कार करण्यात आला याप्रसंगी अशा फाउंडेशनचे आश्रय आशा फाउंडेशनचे अध्यक्ष राजेंद्र पाटील राऊत, आयपीएस अधिकारी प्रताप दिवाकर, अप्पर जिल्हाधिकारी देवदत्त केकाम, दिलीप दळवी, संजय देशमुख ,प्रशांत बच्छाव, श्री दर्शन दगडू, प्राचार्य सि टी रोटे ,स्वप्निल बापू देशमुख व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला
महाराष्ट्रातील अनेक सामाजिक कार्यकर्त्यांचे या प्रसंगी सत्कार करण्यात आला
सामाजिक पत्रकार क्षेत्रातील पुरस्कार मिळाल्याबद्दल परिसरातील त्याच्या मित्र परिवारांनी अभिनंदन केले आहे.
0 Response to "मालेगाव येथे शितल नागदेवे राज्यस्तरीय शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित. "
एक टिप्पणी भेजें