-->
ग्रामीण भागातील घरकुल लाभार्थी निधी 3 लाख व शहरी भागातील घरकुल लाभार्थी यांच्या निधीत 5 लाख वाढ करा.

ग्रामीण भागातील घरकुल लाभार्थी निधी 3 लाख व शहरी भागातील घरकुल लाभार्थी यांच्या निधीत 5 लाख वाढ करा.

  

• प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेच्या वतीने ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे यांना मंत्रालयात निवेदन.

          संजीव भांबोरे 
"साप्ताहिक जनता की आवाज"

मुंबई :- ग्रामीण भागातील घरकुल लाभार्थी यांच्या निधीत 3 लाख व शहरी भागातील घरकुल निधीत 5 लाख रुपये वाढ करण्यात यावे याकरिता दिनांक 25 जून 2026 ला ग्रामविकास मंत्री जय कुमार

गोरे यांच्या मुंबई येथील मंत्रालयात निवेदन देण्यात आले. याबाबत सविस्तर वृत्त असे की दिवसेंदिवस महागाई वाढत आहे त्यामुळे सिमेंट खर्च ,रेती खर्च ,लोहा खर्च ,बद्री, मजुरी खर्च ,मिस्त्री कर्ज, पाणी खर्च व अन्य साधन सामग्रीचे भाव दिवसेंदिवस वाटत आहे .मागील २५ वर्षांपासून साधनसामग्रीत
  चारपट वाढ झालेली आहे .त्यामुळे घरकुल  लाभार्थ्यांना घरकुल बनविताना तारेवरची कार्यकर्ती कसरत करावी लागते. बरेच लोक घरकुल मंजूर होऊन सुद्धा बांधू शकत नाही .त्यामुळे सावकाराकडून कर्ज घ्यावे लागते .त्यामुळे ग्रामीण भागातील घरकुल लाभार्थ्यांना तीन लाख व शहरी भागातील घरकुल लाभार्थ्यांना पाच लाख रुपये निधीत वाढ करण्यात यावे.

0 Response to "ग्रामीण भागातील घरकुल लाभार्थी निधी 3 लाख व शहरी भागातील घरकुल लाभार्थी यांच्या निधीत 5 लाख वाढ करा."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article