-->
शेतकऱ्यांना सम्राट अशोक सेनेकडून जाहीर पाठिंबा.आकाश शिरसाट.

शेतकऱ्यांना सम्राट अशोक सेनेकडून जाहीर पाठिंबा.आकाश शिरसाट.



"साप्ताहिक जनता की आवाज" 
 न्यूज नेटवर्क 

सोलापूर :- जिल्ह्यातील धोत्री येथील गोकुळ शुगर कारखान्याकडून थकीत ऊस बिल मिळत नसल्याने शेतकऱ्यांचा संताप आता शिगेला पोहोचला आहे.
2024-आणि 2025-26 या हंगामातील कोट्यवधी रुपयांची ऊस बिले अद्याप न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडले आहे.अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनानंतरही ठोस निर्णय न झाल्याने शेतकऱ्यांनी जलसमाधी आंदोलनाचा सुरू केला आहे या या आंदोलन करत्या शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजेत अशी आम्ही मागणी करतो
,ऊस कारखान्याला दिला,पण त्याचा मोबदला मिळाला नाही.कर्ज,शेती खर्च आणि घरखर्चाच्या ओझ्याखाली शेतकरी भरडला जात आहे, याला कोण जबाबदार आहे याला कोण जिम्मेदार आहे. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कृषिमंत्री आणि साखर मंत्री,या घटनेला जबाबदार आहे. पोटाची भूक रक्तरंजित क्रांतीला जन्म देते.पुढाऱ्यांनी समजून घेतलं पाहिजे आणि सरकारनी शेतकऱ्यांचा अंत पाहू नये.नाहीतर जीवावर उदार झालेला शेतकरी नरडीचा घोट घेतल्याशिवाय राहणार नाही हा इशारा देतो तात्काळ या शेतकऱ्यांच्या पैसे मिळाले पाहिजे यांच्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजे अशी मागणी केली आहे.संघटनेच्या वतीने संपूर्ण पाठिंबा दिला आहे !!
"सम्राट अशोक सेना महाराष्ट्र राज्य" आकाश दादा शिरसाट.

0 Response to "शेतकऱ्यांना सम्राट अशोक सेनेकडून जाहीर पाठिंबा.आकाश शिरसाट."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article