-->
राज प्रकाश महाडिक ( बी.एल.एस, एल.एल.बी, डी. फार्मसी )

राज प्रकाश महाडिक ( बी.एल.एस, एल.एल.बी, डी. फार्मसी )


• आज माझ्या जीवनातील एक ऐतिहासिक व आनंदाचा दिवस आहे.

        सोनु संजीव क्षेत्रे 
"साप्ताहिक जनता की आवाज"
 
मुंबई  :- मी मुंबई विद्यापीठाची पाच वर्षांची बी.एल.एस, एल.एल.बी, ही कायद्याची पदवी यशस्वीपणे पूर्ण केली आहे. तसेच, यापूर्वी मी डिप्लोमा इन फार्मसी हा अभ्यासक्रमही उत्तीर्ण केला आहे.

माझ्या आई-वडिलांचे स्वप्न साकार करण्याची ही संधी त्यांच्या आशीर्वादाने मला लाभली, याबद्दल मी त्यांचा मनःपूर्वक कृतज्ञ आहे.

आता या कायदेशीर ज्ञानाचा उपयोग समाजातील शेवटच्या घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी नक्कीच होईल, हा विश्वास वाटतो.

हे माझे यश मी माझ्या सर्व कुटुंबियांना, शुभचिंतक, सहकारी, मित्रपरिवार, व्हिक्टर डांटस लॉ कॉलेज, समस्त पाच घर मंडळ (भावकी) गाव-कडावली, तालुका-खेड, जिल्हा-रत्नागिरी व सर्व नागरिकांना समर्पित करतो, कारण त्यांच्या प्रेरणेमुळेच हे सर्व शक्य झाले.

या संपूर्ण शैक्षणिक प्रवासात माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेल्या सर्वांचे मी हृदयपूर्वक आभार मानतो.

0 Response to "राज प्रकाश महाडिक ( बी.एल.एस, एल.एल.बी, डी. फार्मसी )"

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article