-->
जिल्हा सामान्य रुग्णालय (इर्विन) अमरावती येथे पावसाचा कहर.

जिल्हा सामान्य रुग्णालय (इर्विन) अमरावती येथे पावसाचा कहर.



 • अनेक वॉर्ड, सीटी स्कॅन विभाग आणि पोलीस चौकीत पाणी साचले.
        अविनाश गोंडाणे
"साप्ताहिक जनता की आवाज" 

अमरावती :- शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शासकीय इर्विन रुग्णालय परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. रुग्णालयातील विविध वॉर्ड, सीटी स्कॅन विभाग तसेच पोलीस चौकीमध्ये पाणी शिरल्याने आरोग्यसेवा विस्कळीत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांना ये-जा करण्यास अडथळे निर्माण होत आहेत. तसेच उपचार व विविध तपासण्यांसाठी आलेल्या नागरिकांनाही मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. रुग्णालय परिसरात पाणी साचल्याने प्रशासनाच्या नियोजन व व्यवस्थापनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

स्थानिक नागरिक तसेच रुग्णांच्या नातेवाईकांनी जिल्हा प्रशासन आणि महानगरपालिकेकडे तातडीने पाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था करावी व रुग्णालय परिसर सुरक्षित करावा, अशी मागणी केली आहे, जेणेकरून रुग्णांना कोणत्याही प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागू नये.
जनहिताचा विचार करून प्रशासनाने या गंभीर परिस्थितीची तात्काळ दखल घेऊन रुग्णालय परिसरातील साचलेले पाणी काढण्याची व्यवस्था करावी तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.


0 Response to "जिल्हा सामान्य रुग्णालय (इर्विन) अमरावती येथे पावसाचा कहर."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article