योगामुळे मिळते आरोग्य आणि मनशांती:- प्राचार्य राहूल डोंगरे.
बुधवार, 24 जून 2026
Comment
• शारदा विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा.
हर्षवर्धन देशभ्रतार
"साप्ताहिक जनता की आवाज"
तुमसर :- आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त स्थानिक शारदा विद्यालय, तुमसर येथे सामूहिक योग साधना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून योगाचे महत्त्व अधोरेखित केले.
याप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य राहुल डोंगरे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, योग ही भारताची प्राचीन आणि अमूल्य देणगी असून ती शरीर, मन आणि आत्मा यांच्यात संतुलन निर्माण करते. योगामुळे शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक शांतता, एकाग्रता आणि सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते. त्यामुळे योगाचा नियमित सराव प्रत्येकाने आपल्या दैनंदिन जीवनात अंगीकारणे आवश्यक आहे.
ते पुढे म्हणाले की, दरवर्षी २१ जून रोजी जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जातो. उत्तर गोलार्धातील हा वर्षातील सर्वात मोठा दिवस असून तो ऊर्जा, आरोग्य आणि दीर्घायुष्याचे प्रतीक मानला जातो. योगाच्या माध्यमातून निरोगी आणि सुदृढ समाज निर्माण करण्याचा संदेश या दिवसातून दिला जातो.
कार्यक्रमादरम्यान विविध योगासने, प्राणायाम व ध्यानसाधना यांचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. विद्यार्थ्यांनीही उत्साहाने सहभाग घेत योगाचे महत्त्व जाणून घेतले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक दीपक गडपायले, श्रीराम शेंडे, अशोक खंगार, नितुवर्षा मुकुरने, विद्या मस्के, प्रिती भोयर, सुकांक्षा भुरे, श्रेया उरकुडे, नेहा बारई, बेनिता रंगारी, नारायण मोहनकर, दीपक बालपांडे आदींनी विशेष सहकार्य केले.
0 Response to "योगामुळे मिळते आरोग्य आणि मनशांती:- प्राचार्य राहूल डोंगरे. "
एक टिप्पणी भेजें