-->
अपूर्ण राहिलेली कला, काळाच्या पडद्या आड हरपला कलाकार...

अपूर्ण राहिलेली कला, काळाच्या पडद्या आड हरपला कलाकार...


• युवा टॅटू डिझायनर राज मेश्राम यांचे हदय विकाराने निधन.

"साप्ताहिक जनता की आवाज"
       वृत्तपत्र प्रतिनिधी
 
अमरावती :- बडनेरा शहरातील युवा, प्रतिभावान आणि आपल्या कलेच्या माध्यमातून अनेकांच्या मनावर कायमस्वरूपी छाप उमटवणारे टॅटू डिझायनर राज मेश्राम यांच्या अकाली निधनाची बातमी अत्यंत दुःखद आणि मन हेलावून टाकणारी आहे. त्यांच्या निधनाने केवळ त्यांच्या कुटुंबीयांवरच नव्हे, तर मित्रपरिवार, ग्राहक आणि संपूर्ण बडनेरा शहरावर शोककळा पसरली आहे.
टॅटू ही केवळ शरीरावर कोरलेली कलाकृती नसते, तर ती व्यक्तीच्या भावना, आठवणी आणि आयुष्यभर जपल्या जाणाऱ्या क्षणांचे प्रतीक असते. राज मेश्राम यांनी आपल्या कुशल हातांनी आणि कल्पकतेने असंख्य व्यक्तींच्या आयुष्यावर अमिट ठसा उमटवला. त्यांच्या प्रत्येक कलाकृतीत सर्जनशीलता, समर्पण आणि परिपूर्णतेचा ध्यास दिसून येत होता.

आज राज आपल्यात नसले तरी त्यांनी रेखाटलेली कला, त्यांनी जिंकलेली माणसे आणि त्यांनी निर्माण केलेल्या आठवणी सदैव जिवंत राहतील. कलाकाराचे शरीर नश्वर असते, पण त्याची कला अमर असते. राज मेश्राम यांची ओळखही त्यांच्या उत्कृष्ट कलेमुळे आणि मनमिळावू स्वभावामुळे कायम स्मरणात राहील.

अशा उमद्या वयात एका गुणी कलाकाराचा प्रवास अचानक थांबणे ही केवळ त्यांच्या कुटुंबाचीच नव्हे तर समाजाचीही मोठी हानी आहे. त्यांच्या जाण्याने टॅटू कलेच्या क्षेत्रात निर्माण झालेली पोकळी सहज भरून निघणारी नाही.
दुःखाच्या या कठीण प्रसंगी त्यांच्या कुटुंबीयांना, मित्रांना व चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे ‌‌.

"कलेच्या रेषांमध्ये स्वतःचे आयुष्य रंगवणारा कलाकार आज काळाच्या पडद्याआड गेला असला, तरी त्याने कोरलेल्या आठवणी आणि त्याची कला सदैव जिवंत राहील."

       अविनाश गोंडाणे
          अमरावती
       ९९२३२६४१९३

0 Response to "अपूर्ण राहिलेली कला, काळाच्या पडद्या आड हरपला कलाकार..."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article