-->
पवनी तालुका पतसंस्था अभिकर्ता कल्याण संघटनेच्या वतीने.

पवनी तालुका पतसंस्था अभिकर्ता कल्याण संघटनेच्या वतीने.


 

• सुधारित आदर्श उपविधी नियम क्रमांक 8 ब मधील पिग्मी एजंटचे कमिशन 2.5% संदर्भात घेतलेला निर्णय मागे घ्या

• याकरिता सहाय्यक निबंधक यांच्या कार्यालयावर काढण्यात आला होता मोर्चा

संजीव भांबोरे 
"साप्ताहिक जनता की आवाज"
 
भंडारा :-- पवनी येथे सहाय्यक उपनिबंधक कार्यालयावर दिनांक 5 जून 2026 ला पवनी तालुका पतसंस्था अभिकर्ता कल्याण संघटनेच्या वतीने मोर्चा काढून सहकार आयुक्त पुणे यांनी 30 मार्च 2026 ला जो जीआर काढला तो जीआर अन्यायकारक असून त्या जीआर मध्ये पिग्मी एजंटचे कमिशन 2.5 टक्के करण्यात आलेली आहे. यापूर्वी पिग्मी एजंट यांना 4 टक्के कमिशन मिळत होते .त्यामुळे या नवीन जीआर मुळे पिग्मी एजंट वर मोठ्या प्रमाणात अन्याय झालेला आहे .तो झालेला अन्याय दूर करण्यात यावा व त्यांना न्याय देण्यात यावा. सदर मोर्चा हनुमान मंदिर येथून सहाय्यक व उपनिबंधक सहकारी कार्यालय पवनी येथे मोर्चा काढण्यात आला होता. नंतर पवनी येथील तहसीलदार यांना सुद्धा निवेदन देण्यात आले.
आंदोलनाची दखल न घेतल्यास यापुढे भव्य आंदोलन करण्याच्या इशारा सुद्धा यावेळी देण्यात आला. 
सदर मागणीचे निवेदन सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था मुंबई यांना देण्यात आहे. यावेळी संघटनेचे अध्यक्ष विनोद भुरे ,उपाध्यक्ष अमोल भुरे,सचिव प्रशांत लांजेवार व असंख्य पतसंस्था अभिकर्ता कल्याण संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

0 Response to "पवनी तालुका पतसंस्था अभिकर्ता कल्याण संघटनेच्या वतीने."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article