-->
भ्रष्टाचार रोखायचा असेल तर क्लास टु कर्मचारी ते क्लास वन अधिकारी यांच्या संपतीची चौकशी करावी! - विजय चौडेकर,

भ्रष्टाचार रोखायचा असेल तर क्लास टु कर्मचारी ते क्लास वन अधिकारी यांच्या संपतीची चौकशी करावी! - विजय चौडेकर,



विजय चौडेकर 
"साप्ताहिक जनता की आवाज"
 
नांदेड :- आज भ्रष्टाचार इतका बोकाळला आहे प्रत्येक कर्मचारी ते अधिकारी पैसे घेतल्याशिवाय काम करतं नाहीत असे प्रत्येक कार्यालयात निदर्शनास येते आहे कारण एकच भ्रष्टाचारावर नियंत्रण ठेवले जात नाही आणि त्यांच्या वर ठोस कारवाई केली जात नाही नौकरी गेली हरकत नाही गैर मार्गाने पैसा कमाउन श्रीमंत व्हा बस एकच उद्देश या भ्रष्ट अधिकारी लोकांचा आहे, एकुण काय जरी उघड झाले चार सहा महिने निलंबन किंवा बदली, परंतु जी संपती गैर मार्गाने कमावली त्याची चौकशी होणार च नाही,कारण वर पर्यंत लागेबांधे असतात तु भी खा मैं भी खाता,,बाद का बाद देखा जाता,हे जनतेला कळुन चुकलय कित्येक ठिकाणी रिश्वत घेताना रंगेहाथ पकडले महसूल खात्याचा साधा कारकून त्याच्या संपतीची चौकशी करण्यात आली लाखों रुपये घरात सापडले, करोडो रुपयांची जंगम मालमत्ता जप्त केली अशा बर्याच बातम्या मिडिया वर प्रकाशित झाल्या आहेत,हि विचार करण्यासारखी बाब आहे जर साधा कारकुन तीस ते चाळीस हजार रु पगारावर नोकरी करणारा जर करोडो मध्ये खेळतं असेल, तर महसूल अधिकार्याची संपत्ती चा सामान्य माणूस विचार करु शकत नाही काहि ठिकाणी म्हणजे महसूल विभाग, तहसील कार्यालय, बांधकाम खात, महानगर पालिका, समाज कल्याण विभाग,आर टी ओ,खात, पोलिस खात, शिक्षण विभाग,हे खात बस खातं खात् खातच राहतं जर शासनाने या खात्यातील क्लास थ्री कर्मचारी ते क्लास वन अधिकारी यांच्या संपतीची चौकशी करण्यात यावी इतका मोठा भ्रष्टाचार उघडकीस येईल सरकारची आर्धी तिजोरी भरुन जाईल,गरिब लोकांचा हळहळीचा पैसा खाऊन खाऊन गडगंज झालेले मुजोर अधिकारी रस्त्यावर येतील जे अधिकारी पुर्ण सर्विस करुन जेवढा पैसा कमवणार नाहीत तेवढा पैसा तर हे भ्रष्टाचारी लोक दोन तीन वर्षाच्या सर्विस मध्ये कमावून घेत आहेत भ्रष्टाचारी लोकांना सिमाच राहिली नाही पहिले तरी लपून छपून फाईली मध्ये टाकून टेबला खालून पैसे दिले जायचे आता तर उघड उघड पैसे घेत आहेत कोणाचि कशाची भीती राहिली नाही,अशा लोकांन वर कठोर भूमिका घेऊन कडक कायदा बनवला पाहिजे असे मत जनतेतुन व्यक्त होत आहे, जर प्रत्येक कर्मचारी, ते आलं
अधिकारी वर्गाची चौकशी केली पाहिजे तरच बर्याच प्रमाणात भ्रष्टाचारावर आळा बसेल, सामाजिक कार्यकर्ता,मो,९५२९९४४७७० ,,

0 Response to "भ्रष्टाचार रोखायचा असेल तर क्लास टु कर्मचारी ते क्लास वन अधिकारी यांच्या संपतीची चौकशी करावी! - विजय चौडेकर,"

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article