-->
ओबीसीच्या जातीनिहाय जनगणनेसाठी भंडारा येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात मागील 81 दिवसापासून साखळी पासून सुरू केंद्र व राज्य सरकार चे दुर्लक्ष.

ओबीसीच्या जातीनिहाय जनगणनेसाठी भंडारा येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात मागील 81 दिवसापासून साखळी पासून सुरू केंद्र व राज्य सरकार चे दुर्लक्ष.


• ३ ऑगस्ट पासून भंडारा जिल्ह्यातून मंडल यात्रेला सुरुवात होणार.

.   OBC संघर्ष समितीचे कार्यकर्ते बे.सा.उपोषण सुरू

संजीव भांबोरे 
"साप्ताहिक जनता की आवाज" 

भंडारा :- ओबीसी समाजाची जागतिक जातीनिहाय जनगणना करण्यात यावी या प्रमुख मागणी करिता मागील 81 दिवसापासून भंडारा येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात (त्रिमूर्ती चौक)साखळी उपोषण सुरू आहे परंतु त्या साखळी उपोषणाकडे केंद्र व राज्य सरकारचे दुर्लक्ष आहे त्यामुळे सकल ओबीसी महामोर्चाच्या वतीने ओबीसींच्या जातीनिहाय जनगणनेसाठी मंडल यात्रा ३ ऑगस्ट २०२६ पासून मंडप यात्रा सकाळी दहा वाजेपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथून सुरू होऊन नऊ ऑगस्ट 2026 दुपारी तीन वाजेपर्यंत प्रियदर्शनी सभागृह चंद्रपूर येथे या रॅलीचे समापन होणार आहे ओबीसी जातनिहाय मंडल यात्रेचा मार्ग भंडारा नागपूर वर्धा यवतमाळ वाशिम बुलढाणा अकोला अमरावती नागपूर ग्रामीण गोंदिया गडचिरोली चंद्रपूर असा असेल. या मंडळी यात्रेत केंद्र व राज्य सरकारकडे या मागण्यांच्या पाठपुरावा करण्यात येणार आहे त्यामध्ये प्रमुख केंद्र सरकारने अनुसूचित जाती जमाती प्रमाणे ओबीसी समुदयासाठी स्वतंत्र कालाम देऊन जातनिहाय जनगणना करावी, केंद्र सरकारमध्ये ओबीसी साठी स्वतंत्र मंत्रालय निर्माण करण्यात यावे, महा ज्योती महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था या संस्थेत 1000 कोटीचा निधी देण्यात यावा, इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र ओबीसी कार्यालय अधिकारी आणि महात्मा फुले ओबीसी भवन उभारण्यात यावे, घरकुल योजनेअंतर्गत मिळणारे आर्थिक सहाय्य पाच लाख रुपये करण्यात यावे, सर्व व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमातील ओबीसी विद्यार्थ्यांना शंभर टक्के शिष्यवृत्ती लागू करण्यात यावी, ओबीसी कर्मचाऱ्यांचा एक लाख पदांचा बॅकलाग तात्काळ भरण्यात यावा, महाराष्ट्र शासनाने ओबीसी समुदायाला लोकसंख्येच्या प्रमाणात बजेटमध्ये निधीची तरतूद करावी, इतर मागास आर्थिक विकास महामंडळाला युवकांच्या उद्योगासाठी 1000 कोटीचा निधी उपलब्ध करून देण्यात यावा, यातील प्रत्येक तालुक्यात ओबीसी विद्यार्थ्यांसाठी एकूण 720 स्वतंत्र वस्तीगृह सुरू करण्यात यावी, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेचा लाभ 21 हजार 600 विद्यार्थ्यांना देण्यात यावा, किमान 500 ओबीसी विद्यार्थ्यांना परदेशी शिष्यवृत्ती मंजूर करण्यात यावी, शेतकऱ्यांसाठी स्वामीनाथन आयोग लागू करून योग्य हमीभाव देण्यात यावा, इत्यादी मागण्यांकरिता ओबीसीच्या जातीने जनगणनेसाठी मंडल यात्रा काढण्यात येणार आहे. वरील ओबीसी मंडल यात्रेत जिल्ह्यातील सर्व ओबीसी बांधव, विविध ओबीसीच्या संघटना यांनी सहकार्य करावे असे आवाहन सदानंद इलमे, प्रभाकर वैरागडे, गोपाल सेलोकर ,डॉ. बाळकृष्ण सार्वे ,संजीव बोरकर ,सुरेश खंगार,मंगला वाडीभस्मे ,ललिता देशमुख ,अनिल डहाके, पियुष आकरे , खेमेंद्र कटरे ,सतीश मालेकर, मुकुंद अडेवार ,मोहन हरडे ,सावंत कटरे, अशोक लंजे, सुभाष उके ,लोकमान्य बरडे,विलास काळे व उमेश कोरम मुख्य संयोजक सकल ओबीसी महामोर्चा यांनी केलेली आहे.

0 Response to "ओबीसीच्या जातीनिहाय जनगणनेसाठी भंडारा येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात मागील 81 दिवसापासून साखळी पासून सुरू केंद्र व राज्य सरकार चे दुर्लक्ष."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article