-->
प्रा.श्रीकृष्ण बनसोड यांच्या वऱ्हाड विकास मासिकाच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन.

प्रा.श्रीकृष्ण बनसोड यांच्या वऱ्हाड विकास मासिकाच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन.

"साप्ताहिक जनता की आवाज"
 वृत्तपत्र प्रतिनिधी 

अमरावती :- फुले - शाहू -आंबेडकर यांच्या सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीतील समर्थ साक्षीदार असलेल्या सत्यशोधक प्रा.श्रीकृष्ण बनसोड संपादित 'वऱ्हाड विकास' या मासिकाचा ३९ वा वर्धापनदिन मातोश्री सावित्रीबाई फुले विद्यालय, मणकर्णानगर,अमरावती येथे दि.२ जुलै २०२६, गुरुवारी दुपारी १ वाजता संपन्न होत आहे.वर्धापनदिनाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त मा.श्री मधुकरराव अभ्यंकर असून प्रमुख अतिथी साहित्यिक व अभंगकार प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले, प्रसिद्ध नाट्यकर्मी प्रा.पी.जी. भामोदे, लेखिका डॉ.निर्मला भामोदे (समाज भूषण पुरस्कार,महाराष्ट्र राज्य), सामाजिक कार्यकर्ते मा.कमलाकर घोंगडे (माजी पोलीस अधिक्षक ),पत्रकार मा.गोपाल हरणे उपस्थित राहणार आहेत.याप्रसंगी कु.सुषमा राम शोकोकार " मी सावित्रीबाई फुले बोलते ." हा एकपात्री नाट्यप्रयोग सादर करणार आहे.कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे संपादक प्रा.श्रीकृष्ण बनसोड,प्रबंध संपादक डॉ.प्रवीण बनसोड,सहसंपादक गोविंद‌ फसाटे यांनी कळविले आहे.

0 Response to "प्रा.श्रीकृष्ण बनसोड यांच्या वऱ्हाड विकास मासिकाच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article