-->
नीट पेपर फुटी मुळे विद्यार्थ्यांच्या आत्महत्येस कारणीभूत असलेल्या केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना पदावरून तात्काळ हटवा -विविध सामाजिक संघटनेची मागणी.

नीट पेपर फुटी मुळे विद्यार्थ्यांच्या आत्महत्येस कारणीभूत असलेल्या केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना पदावरून तात्काळ हटवा -विविध सामाजिक संघटनेची मागणी.



संजीव भांबोरे 
"साप्ताहिक जनता की आवाज" 

भंडारा :- नीट पेपर फूटप्रकरणी 17 विद्यार्थ्यांच्या आत्महत्येस प्रवृत्त असलेले भारताचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना त्यांच्या पदावरून तात्काळ हटविण्यात यावे व सोनम वांगचू यांच्या जंतर-मंतर येथील आमरण उपोषणाला समर्थन देण्याकरता आज दिनांक 2 जुलै 2026 ला लाखांदूर येथे भव्य धरणे ,निदर्शने आंदोलने करण्यात आली. याबाबत सविस्तर वृत्त असे की, देशात नीट चे पेपर फुटल्यामुळे 17 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आहे. नीट च्या परीक्षा सुरळीत पार पडल्या असत्या तर 17 विद्यार्थ्यांनी आत्महत्या करण्याची वेळ आली नसती. मात्र शिक्षण मंत्री यांच्या दुर्लक्ष पणामुळे व शिक्षण विभागाच्या भोंगळणामुळे सर्व घडले आहे. देशाचा आतापर्यंत 80 पेक्षा जास्त वेळा पेपर फुटले असून लाखो तरुणांचे जीवन जीवन उध्वस्त झाले आहे हे सर्व शासनाच्या नातर नातरके पणाचे परिणाम आहेत. त्यामुळे देशाचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना त्यांच्या मंत्री पदावरून तात्काळ हटविण्यात यावे.
शिक्षण प्रणाली मध्ये सुधारणा करून नीट पेपर फुटी करिता शिक्षण मंत्री यांना जबाबदार धरून त्यांना तात्काळ पदावरून हटविण्यात यावे या मागणी करिता अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वात काक्रोज जनता पार्टीच्या बॅनरखाली दिल्ली येथे जंतर मंतरवर शेकडो युवकांनी 20 जून 2026 पासून धरणे आंदोलनाला सुरुवात केली आहे. तसेच सोनम वांगचूंग यांनी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनामाच्या मागणीसाठी दिल्ली येथे जंतर-मंतरवर बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या आंदोलनास विविध सामाजिक संघटनेच्या वतीने समर्थन देण्यात आले .
अभिजीत दिपके व आंदोलन करते विद्यार्थी यांच्या मागण्या संबंधित चर्चा न करता उलट त्यांना तो पाकिस्तानी आतंकवादीची बी टी म्हणून अपमानित केले जात आहे .अभिजीत दिपके हे संविधानिक मार्गाने ,शांतता मार्गाने आंदोलन करीत असून त्यांच्या आंदोलन स्थळी काही गुंड प्रवृत्तीचे लोक जाऊन मारण्याची धमकी करीत आहेत अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर कारवाई करण्याऐवजी पोलीस मात्र बघायची भूमिका घेत आहेत .आंदोलन स्थळावरील वीज ,पाणी, एवढेच नाही तर आंदोलन कर्त्यांना देण्यात येणारे खाद्य सुद्धा रोखले जात आहे ही अत्यंत निंदनीय बाब आहे अशा गुंड प्रवृत्तीचा निषेध करण्यात येत आहे व खालील मागण्यांच्या पूर्ततेसाठी विविध सामाजिक संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात येत आहे. नीट चे पेपर फुटल्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या त्यांच्या कुटुंबांना एक कोटी रुपयाची आर्थिक मदत देण्यात यावी ,नीट पेपर फुटीस जबाबदार असलेले शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना तात्काळ मंत्रिपदावरून हटविण्यात यावे ,टीईटी पेपर फुटीस जबाबदार म्हणून महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांना तात्काळ मंत्री पदावरून हटविण्यात यावे, दिल्ली येथील आंदोलन स्थळी आंदोलन कर्त्यास मारझोड करणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर तात्काल कारवाई करण्यात यावी ,आंदोलन स्थळावरील वीज ,पाणी बंद करणाऱ्या तसेच आंदोलन कर्त्यास खाद्य पुरवठा रोखणाऱ्या अधिकाऱ्याला ताबडतोब निलंबित करण्यात यावे ,असे मागण्यांचे निवेदन तहसीलदार लाखांदूर मार्फत देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले आहे. निवेदन देताना चंद्रशेखर टेंभुर्णे माजी समाज कल्याण सभापती भंडारा, सुरेश ब्राह्मणकर सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती लाखांदूर, विनोद ढोरे लाखांदूर तालुका अध्यक्ष उभाठा, नरेश दिवटे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार, मंगेश राऊत पंचायत समिती सदस्य लाखांदूर ,,प्राध्यापक अनिल काणेकर ,हमराज डोये, प्रकाश बारसागडे, नीरु ताई मेश्राम,संदीप मरगडे व अनेक कार्यकर्ते यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.

0 Response to "नीट पेपर फुटी मुळे विद्यार्थ्यांच्या आत्महत्येस कारणीभूत असलेल्या केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना पदावरून तात्काळ हटवा -विविध सामाजिक संघटनेची मागणी."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article