-->
निदा खानला जामीन मंजूर.

निदा खानला जामीन मंजूर.


• देताना कोर्टाकडून श्रीकृष्णाच्या जन्माचा दाखला, न्यायालयाचा सविस्तर निकाल हाती...

 • नाशिकमधील TCS कंपनीतील बळजबरीने धर्मांतर प्रकरणातील संशयित आरोपी निदा खान हिला न्यायालयाने जामीन दिला आहे. ती गरोदर असल्याने तिला मोठा दिलासा मिळाला.

"साप्ताहिक जनता की आवाज" 
         न्यूज नेटवर्क
 
नाशिक :- नाशिक मधील TCS कंपनीतील
महिला कर्मचाऱ्यांचे कथित लैंगिक शोषण आणि बळजबरीने धर्मांतर प्रकरणातील संशयित आरोपी निदा खान हिला अखेर जामीन मंजूर झाला आहे. निदा खानला जामीन देताना न्यायालयाने महाभारतातील भगवान श्रीकृष्णाच्या जन्माचा दाखला दिला आहे. ज्याची सर्वत्र चर्चा सुरु आहे.

दोन महिन्यांहून अधिक काळ तुरुंगात असलेल्या निदा खानला नाशिकच्या विशेष न्यायालयाने मोठा दिलासा दिला. दोन दिवसांपूर्वीच निदासह तौसिफ अत्तारला जामीन देण्यात आला. हा जामीन देताना विशेष न्यायालयाने थेट भगवान श्रीकृष्णाच्या जन्माचा दाखला देत एक अत्यंत संवेदनशील आणि ऐतिहासिक टिप्पणी केली आहे.

आता न्यायालयाचा सविस्तर निकाल हाती पडल्यानंतर निकालात पाच महिन्यांची गर्भवती असलेल्या निदा खानबाबत न्यायालयाने सहानुभूती दाखविल्याचे स्पष्ट झाले आहे. न्या. केदार जोशी यांनी निदाच्या जामीन अर्जावर निकाल दिला. निकाल देताना न्यायाधीश म्हणाले की, संशयित आरोपी निदा ही गर्भवती असल्याचे निर्विवाद असून, नवजात बाळाच्या हिताचा विचार करणे आवश्यक असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

 गर्भवती निदा खानला कारागृहात जड कामे ? रक्त कमी असल्याचा वकिलांचा दावा; जामिनाकडे लक्ष

आदेशात न्यायालयाने म्हटले की, भगवान श्रीकृष्णाप्रमाणे तुरुंगात जन्म घेण्याचा आघात किंवा त्यासंबंधीचा सामाजिक कलंक कोणालाही सहन होण्यासारखा नाही. अशी क्लेशदायक' परिस्थिती टाळण्यासाठी आणि नवजात बाळाच्या स्वागतासाठी तसेच त्याच्या सर्वांगीण हितासाठी अर्जदार-आरोपीच्या बाजूने न्यायालयीन विवेकाधिकाराचा वापर करणे न्याय्य आणि योग्य ठरेल. 

न्यायालयाने पुढे म्हटले की, योग्यू अटी घालून अभियोग पक्षाच्या हिताचे पुरेसे संरक्षण करता येऊ शकते. जामीन मंजूर करण्यामागील मूलभूत उद्देश हा खटल्यादरम्यान न्यायालयातील उपस्थिती सुनिश्चित करणे हा असल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले. या निरीक्षणांच्या आधारे न्यायालयाने निदा खान हिला आवश्यक अटींसह जामीन मंजूर केला आहे.

 'क्या हनीफभाई, आज-कल काम में नही आतें..'; मतीन पटेलचा एक फोन अन निदा खानला लपायला मिळालं घर ?

दरम्यान, न्यायालयात सुनावणी दरम्यान पीडितेच्या वकिलांनी या जामिनाला तीव्र विरोध केला. मात्र, निदा खानबाबत तपास पूर्ण झाला असल्याने निदाला कारागृहात ठेवल्याने कोणताही हेतू साध्य होणार नसल्याचे न्यायालयाने म्हटले. निदा खानला जामीन मिळाला असला, तरी ती निर्दोष आहे, असे होत नाही. खटल्याची सुनावणी बाकी असल्याचे सरकारी वकिलांनी नमूद केले.

0 Response to "निदा खानला जामीन मंजूर. "

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article