शासकीय विश्रामगृह नांदेड प्रहार दिव्यांग सदस्य नोंदणी चा कार्यक्रम आयोजित केला आहे.
सोमवार, 3 अगस्त 2026
Comment
विजय चौडेकर
"साप्ताहिक जनता की आवाज
नांदेड (प्रतिनिधी) :- नांदेड तालुक्यातील सर्व दिव्यांग बांधवांना सुचित करण्यात येत आहे की उद्या दिनांक 3/8/2026 रोजी दिव्यांग बांधवांचे हृदय सम्राट आमदार प्रहार शिवसेनेचे ओमप्रकाश उर्फ बचुभाऊ कडू यांच्या आदेशावरून नांदेड तालुक्यामध्ये उद्या प्रहार दिव्यांग सदस्य नोंदणीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे.
या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख विठ्ठलराव कल्याणकर साहेब व प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे जिल्हाप्रमुख पंढरीनाथ हुंडेकर साहेब व नांदेड दक्षिणचे सचिव मगरूळे मामा या बैठकीला मार्गदर्शन करणार आहेत तरी नांदेड तालुक्यातील सर्व दिव्यांग बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने आपल्या नांदेड येथील शासकीय विश्रामगृहात सकाळी 11 वाजता येण्याची कृपा करावी बैठकीचे निमंत्रण देणारे नांदेड उत्तर चे तालुका अध्यक्ष विनोद कोकाटे चिखलीकर व नांदेड दक्षिणचे उपतालुकाप्रमुख नवनाथ क्षीरसागर कल्हाळकर व सचिव भगवान इंगोले कासारखेडकर.
0 Response to "शासकीय विश्रामगृह नांदेड प्रहार दिव्यांग सदस्य नोंदणी चा कार्यक्रम आयोजित केला आहे."
एक टिप्पणी भेजें