-->
सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील विकास कामांना घेऊन महत्त्वपूर्ण बैठक.

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील विकास कामांना घेऊन महत्त्वपूर्ण बैठक.

• खासदार डॉ. नामदेव कीरसान यांची दूरदृष्य प्रणाली द्वारे विशेष उपस्थिती ; जिल्ह्यातील विविध समस्यांकडे वेधले लक्ष.

"साप्ताहिक जनता की आवाज"
 वृत्तपत्र प्रतिनिधी 

गडचिरोली :- राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे जिल्ह्यातील विविध विकास प्रकल्प व प्रलंबित कामांच्या अनुषंगाने महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीस गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. नामदेवजी किरसान यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे विशेष उपस्थिती दर्शवून जिल्ह्यातील रस्ते, पूल व विविध विकासकामांच्या समस्यांकडे सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांचे लक्ष वेधले.
एटापल्ली तालुक्यातील कोठीकोरणार येथे बांधण्यात आलेला पूल अवघ्या तीन वर्षांत कोसळल्याच्या घटनेचा मुद्दा खासदार डॉ. किरसान यांनी बैठकीत उपस्थित केला. या कामाची सखोल चौकशी करून निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या कंत्राटदारासह संबंधित सर्व दोषींवर कठोर कारवाई करावी, केवळ कनिष्ठ कर्मचाऱ्यांवर कारवाई करून प्रकरण संपवू नये, तर यामध्ये दोषी असणाऱ्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांवर सुद्धा कठोर  कारवाही अशी मागणी त्यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे केली.

लोकप्रतिनिधी हे जनतेच्या समस्या आणि स्थानिक गरजा लक्षात घेऊन विकासकामांची शिफारस करीत असतात. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी शिफारस केलेल्या अत्यावश्यक कामांना प्राधान्य देऊन तातडीने मंजुरी व निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणीही खासदार डॉ. किरसान यांनी केली.

*बैठकीत त्यांनी पुढील महत्त्वाच्या मागण्या मांडल्या.*

1) कुंभी-चांदाळा तसेच रानमूल-माडेमुल या गावांना जोडणाऱ्या पोटफोडी नदीवर पुलाचे बांधकाम अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. गडचिरोली शहरापासून अवघ्या ८ ते १० किलोमीटर अंतरावर असतानाही दरवर्षी पावसाळ्यात या गावांचा संपर्क तुटतो. त्यामुळे या पुलाच्या कामाला तातडीने मंजुरी देण्याची मागणी करण्यात आली.

2) मंगेवाडा ते मंगेवाडा टोला, येरमागड येथील मोठ्या नाल्यावर पुलाचे बांधकाम करण्याची मागणी करण्यात आली. या पुलाच्या मागणीसाठी अलीकडेच शाळकरी विद्यार्थ्यांनी पाण्यात उभे राहून आंदोलन केले होते. विद्यार्थ्यांसह नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेता हे काम तातडीने हाती घेण्याची मागणी खासदारांनी केली.

3)  सावंगा ते मंगेवाडा  हा मार्ग छत्तीसगड सीमेला जोडणारा महत्त्वाचा मार्ग असून पावसाळ्यात बांडिया नदीला पूर आल्याने या मार्गावरील संपर्क तुटतो. त्यामुळे या पुलाचे बांधकाम अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

4)  सालेभट्टी ते चिचोली-धानोरा मार्गावरील कठाणी नदीवर पूल नसल्याने विद्यार्थ्यांसह नागरिकांना अवघे ५ किलोमीटरचे अंतर तब्बल २५ किलोमीटरचा प्रवास करून पार करावे लागत असल्याने या ठिकाणी पुलाचे बांधकाम करण्याची मागणी करण्यात आली.

5) मीचगाव बुजुर्ग ते फासिटोला दरम्यान कठाणी नदीवर पूल बांधून हा मार्ग दूधमाळा राष्ट्रीय महामार्गाला जोडल्यास परिसरातील २० ते २५ गावांना गडचिरोलीशी थेट संपर्क मिळणार आहे. त्यामुळे या पुलाच्या कामास प्राधान्य देण्याची मागणी खासदार डॉ. किरसान यांनी केली.

यासोबतच जिल्ह्यातील इतरही महत्त्वाचे रस्ते, पूल, पुलिया तसेच प्रलंबित विकासकामांना आवश्यक निधी उपलब्ध करून देत ती कामे गतीने पूर्ण करावीत, अशी मागणी खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी बैठकीत केली.

या बैठकीस दूरदृश्य प्रणालीद्वारे जिल्ह्याचे सहपालकमंत्री आशिष जी जयस्वाल, आमदार रामदासजी मसराम, आमदार मिलिंद जी नरोटे, जिल्हाधिकारी अविश्यांत पांडा, पोलीस अधीक्षक एम. रमेश, गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू प्रशांत बोकारे यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभाग व इतर विभागाचे अधिकारी पदाधिकारी उपस्थित होते.

0 Response to "सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील विकास कामांना घेऊन महत्त्वपूर्ण बैठक."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article