-->
 पातुर तालुक्यातील चानी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये खुलेआम हप्ते घेऊन वरली मटका, देशी दारू, गावठी दारू, अवैध धंदे सुरू.

पातुर तालुक्यातील चानी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये खुलेआम हप्ते घेऊन वरली मटका, देशी दारू, गावठी दारू, अवैध धंदे सुरू.

 

          गुलाबराव अंभोरे 
"साप्ताहिक जनता की आवाज"
 
 पातुर/चानी :- तालुक्यातील चानी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेले अंदाजी गावे ४३ ते ४५ गावामध्ये अवैध दोन नंबरचे धंद्यांच्या लोकांना चानी पोलिसांच्या आशीर्वादाने नशिबच उघडले. अशी प्रत्येक गावातील नागरिकांची चर्चा सुरू आहे. प्रत्येक गावात वरली मटका, जुगार, टेबल वरली ,देशी दारू, गावठी दारू, अवैध पेट्रोल, गुटका, असा कमीत कमी हप्ता दहा लाखापर्यंत वसूल केला जातो अशी नागरिकांची प्राथमिक चर्चा आहे. या अगोदर महिलांनी, आणि नागरिकांनी पोलीस स्टेशनला निवेदने दिली परंतु त्याचा काहीच आसर झाला नाही. अजून पण राजरोजपणे धंदे सुरू आहेत. ज्यांच्या हाती कायदा व सुव्यवस्था ची जबाबदारी आहे तोच रक्षक जर या देशाचा भक्षक बनला तर काय होईल? सामान्य लोकांना कोण न्याय देणार? यावेळी धंद्यामुळे कित्येक लोकांचे संसार उध्वस्त झाले . कितीक महिलांनी या अगोदर या पाई आत्महत्या केल्या. शाळेतील मुलं व्यसन पद्धत होत आहेत. दिवसभर शेतात काम करून मटका आणि दारू यामध्ये पैसा गेला म्हणजे कुटुंब मुलासह रात्री उपाशी झोपतो. याचा विचार कोण करेल ? आज काल हराम च्या पैशावर खूप नजर आहे. काल परवाच शरणगाव येथे नवीन वर्ली मटकाचे हप्ता घेऊन परमिशन दिले एका एका गावा मध्ये दोन दोन धंदे चे परमिशन दिले आहे. येथील ठाणेदार पत्रकारासोबत अवैध धंद्या विषयी कोणतीच बाईट , किंवा मुलाखत देत नाहीत, म्हणून पोलीस अधीक्षक अकोला आणि उपविभागीय पोलीस अधिकारी बाळापुर यांच्याकडे नागरिकांची तक्रार जाण्याची संभावना आहे.

0 Response to " पातुर तालुक्यातील चानी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये खुलेआम हप्ते घेऊन वरली मटका, देशी दारू, गावठी दारू, अवैध धंदे सुरू."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article