राजश्री शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन समिती रद्द करा.
सोमवार, 31 अगस्त 2026
Comment
• याकरिता श्रीकांत नागदेवे यांचे भंडारा येथे आंबेडकर चौक येथे आमरण उपोषण सुरू
• जिल्हाधिकारी यांनी 2 ऑगस्टला बोलाविली बैठक
• पत्रकार संजीव भांबोरे यांनी उपोषण मंडपाला भेट देऊन समस्येवर केली चर्चा
संजीव भांबोरे
"साप्ताहिक जनता की आवाज"
भंडारा :- येथील जिल्हाधिकारी कार्यालय समोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात मागील २४ ऑगस्ट २०२६ पासून अमरकला सांस्कृतिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत अंबादास नागदेवे हे आमरण उपोषणास बसले आहेत. त्यांच्या आंदोलनाला आज ८ दिवस होत आहेत. परंतु कोणतीही जिल्हा प्रशासन स्तरावर कारवाई करण्यात आलेली नाही. याबाबत पत्रकार संजीव भांबोरे यांनी आज दिनांक ३१ ऑगस्ट २०२६ ला उपोषण स्थळी भेट देऊन त्यांच्याशी संवाद साधला असता आजपर्यंत एकाही अधिकाऱ्याने उपोषण स्थळी भेट देत नसल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे पोलीस प्रशासन सुद्धा रात्रीला संरक्षण देत नसल्याचे त्यांनी यावेळी खंत व्यक्त केली. ते म्हणाले की जिल्ह्यात राजश्री शाहू महाराज जेष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन सन्मान योजना जी समिती स्थापना करण्यात आली ती अशासकीय सदस्य निवड समिती तात्काळ रद्द करण्यात यावी, जिल्ह्यातील लोककलावंत, नामवंत साहित्यिक ,ज्येष्ठ कलावंतांना निवड समितीमध्ये समाविष्ट करण्यात यावेत ,जिल्ह्यात सदर योजनेअंतर्गत बोगस कलावंतांना मिळणारे मानधन तात्काळ बंद करावेत असे सुद्धा त्यांनी सदर पत्रकारांशी चर्चा करताना सांगितले. ही समिती का रद्द करण्यात यावी यावर पत्रकार संजीव भांबोरे यांनी प्रश्न उपस्थित केला असता सदर समितीतील अशासकीय सदस्य हे तज्ञ व लोक कलावंत नाहीत त्यामुळे ते खऱ्या व गरजू कलावंतांना न्याय देऊ शकत नाही . त्यामुळे निवड समितीत होणाऱ्या भ्रष्टाचारावर अंकुश ठेवता येत नाही.त्यामुळे छत्रपती शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन सन्मान योजना तात्काळ रद्द करून नव्याने गठीत करण्यात यावी. सदर आमरण उपोषणाची जिल्हाधिकारी यांनी दखल घेतली असून जिल्हाधिकारी कार्यालय कक्षात अशासकीय सदस्य व अमरकला सांस्कृतिक मंडळातील कार्यकर्त्यांची बैठक ४.३० वाजता आयोजित करण्यात येणार असल्याचे पत्र सहाय्यक गटविकास अधिकारी पंचायत विभाग जिल्हा परिषद भंडारा रामदास कोडवते यांच्या उपस्थितीत श्रीकांत नागदेवे यांच्या सुपूर्त करण्यात आले.या बैठकीत काय निर्णय होते याकरिता सर्व कलावंतांचे लक्ष लागलेले आहे. यावेळी पत्रकार डी जी .रंगारी, अचल मेश्राम, मनोज बागडे,, शाहीर गणेश मेश्राम, शाहीर सुबोध कानेकर, संजय नागदेवे ,कल्पना कामथे, ज्योती देव, प्रमोद बघमारे , राजेंद्र लांजेवार ,माधव चेटुले,रुक्मिणी वाढवे, सुरमा बारसागडे ,रवीबाबू भाऊसागर ,कार्तिक मेश्राम ,राजू गजभिये, जयपाल वाघाडे,प्रकाश नाकतोडे, शाहीर अंबादास नागदेवे, व पत्रकार ,कलावंत ,साहित्यिक उपस्थित होते.
0 Response to "राजश्री शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन समिती रद्द करा."
एक टिप्पणी भेजें