-->
शेतकरी केंद्रबिंदू मानून क्षेत्रीय स्तरावर आकृतीबंध आराखडा तयार करा- शेतकऱ्यांची मागणी.

शेतकरी केंद्रबिंदू मानून क्षेत्रीय स्तरावर आकृतीबंध आराखडा तयार करा- शेतकऱ्यांची मागणी.


संजीव भांबोरे 
"साप्ताहिक जनता की आवाज"
 
भंडार :- शासनाने कृषी विभागाने तयार केलेला नवीन आकृतीबंध हा शेतकऱ्यांच्या हिताच्या नसून तो शेतकऱ्याला मारक ठरणार आहे .कारण की ह्या आकृतीबंध मध्ये क्षेत्रीय स्तरावरील सहाय्यक कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, यांच्या जागा कमी केलेली आहेत. त्यामुळे क्षेत्रीय स्तरावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन वेळेत मिळणार नाही तसेच क्षेत्रीय स्तरावर त्यांना कुठलेही ऑफिस किंवा मंडळ कृषी अधिकारी कार्यालय बंद केल्यामुळे शेतकरी परिसरातील शेतकरी हे संपर्क करू शकत नाही किंवा त्यांना कुठे एखादा काम पडलं तर कृषी विषयक योजना किंवा एखाद्या सहाय्यक कृषी अधिकारी किंवा कृषी पर्यवेक्षक यांना जर भेटायचे पडले तर ते त्यांना उपलब्ध होऊ शकणार नाही .कारण त्या परिसरात क्षेत्रीय कार्यालय नसल्यामुळे किंवा त्यांना बसण्याची जागा उपलब्ध नसल्यामुळे ते शेतकरी त्यांना भेटणार नाही. म्हणजे शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागणार आहे. शेतकऱ्याची कामे वेळेत होणार नाहीत .परिणामी हा जो आकृतीबंध आहे हा शेतकऱ्यांना मारक ठरणार आहे .त्यामुळे शासनाने या आकृतीबंधाचा फेरविचार करून शेतकऱ्याच्या दृष्टीने हिताच्या कसा होईल ते बघावे आणि नव्याने आकृतीबंध आकृतीबंध रद्द करून नव्याने आकृतीबंध तयार करावा अशी ही परिसरातील शेतकऱ्यांची , लोकप्रतिनिधी मागणी आहे. कृषी अधिकारी यांना शेतीच्या दीर्घ अनुभव आहे असे वरिष्ठ अधिकारी हे कार्यालयात बसणार त्यामुळे शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन हा मिळू शकणार नाही .त्यामुळे कार्यालय मर्यादित आहे. कार्यालयाच्या व्याप्ती वाढवणार आहे. त्यामुळे क्षेत्रीय स्तरावर त्या अधिकाऱ्यांना त्या कार्यालयात न बसविता क्षेत्रीय स्तरावर त्याची नियुक्ती करावी. जेणेकरून शेतकऱ्यांना वेळेत मार्गदर्शन मिळेल. सदर आकृतीबंधामध्ये कृषी सहाय्यक, कृषी अधिकाऱ्यांच्या साझा निर्मिती ही खातेदारावर आधारित आहे .यामध्ये 1500 खातेदारांना एक कृषी सहाय्यक अशा प्रकारे रचना असल्यामुळे सदर साझा मध्ये जास्त शेतकरी येतात. त्यामध्ये तेवढ्या क्षेत्रात ते परिवहन करणे, तेवढ्या क्षेत्रामध्ये शेतकऱ्याचे संपर्क करणे हे कठीण होणार आहे .त्यांच्या संपर्क होणार नाही . त्यामुळे शासनाने क्षेत्रीय क्षेत्रावर आधारित त्या गावाच्या शेतकऱ्याच्या क्षेत्रावर आधारित साझा रचना करावी. जेणेकरून कृषी सहाय्यक, सहाय्यक कृषी अधिकारी जो येणारा ताण आहे तो ताण कमी होईल .आणि शेतकऱ्याचे जे कामे आहेत जलद गतीने होतील. नवीन आकृतीबंधात शेतकऱ्याला त्रास सहन करावे लागेल आणि हा जो आकृतीबंध आहे हा शेतकऱ्यांना फायद्याच्या ठरणार नाही म्हणून नवीन आकृतीबंध तयार करताना शेतकऱ्याला केंद्रबिंदू मानून आकृतीबंध तयार करावा. जेणेकरून शेतकऱ्याचे कुठे हाल न होता हा दीर्घ म्हणजे त्याच्या हिताखा ठरणार आहे.

0 Response to "शेतकरी केंद्रबिंदू मानून क्षेत्रीय स्तरावर आकृतीबंध आराखडा तयार करा- शेतकऱ्यांची मागणी."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article