अड्याळ येथील सरपंच शिवशंकर मुंगाटे यांचा वाढदिवस उत्साह साजरा.
शनिवार, 29 अगस्त 2026
Comment
संजीव भांबोरे
"साप्ताहिक जनता की आवाज"
भंडारा :- पवनी तालुक्यातील अड्याळ येथील प्रथम नागरिक सरपंच शिवशंकर मुंगाटे व माजी पंचायत समिती सदस्य यांच्या वाढदिवस आज दिनांक 29 ऑगस्ट 2026 ला केक कापून उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अड्याळ मंडळाचे बीजेपी चे अध्यक्ष प्रकाश कुर्जेकर, उपस्थित होते. तर प्रमुख अतिथी म्हणूनशिक्षक सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष संजय आजबले ,प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे, उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन विकास टेंभुर्णे यांनी केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी पौर्णिमा साखरे, गावातील बरेच प्रतिष्ठित नागरिक व परिसरातील चाहता वर्ग प्रामुख्याने उपस्थित होता. यावेळी उपस्थित सर्व नागरिकांनी सहभोजनाचा आस्वाद घेतला.
0 Response to "अड्याळ येथील सरपंच शिवशंकर मुंगाटे यांचा वाढदिवस उत्साह साजरा. "
एक टिप्पणी भेजें