अड्याळ येथील गुजरी चौकातील मुत्री घराकरता जिल्हा परिषद फंडातून ५ लाख रुपये मंजूर- सरपंच शिवशंकर मुंगाटे.
मंगलवार, 8 सितंबर 2026
Comment
• येत्या ८ दिवसात कामाला सुरुवात करणार पत्रकार संजीव भांबोरे यांना दिले आश्वासन
• मुत्रीघर परिसर स्वच्छता रंगो रंगोटी याबाबतीत दूरध्वनी वरून केला होता संपर्क.
संजीव भांबोरे
"साप्ताहिक जनता की आवाज"
भंडारा :-- पवनी तालुक्यातील अड्याळ येथील गुजरी चौकातील पाण्याच्या टाकीजवळ असलेले मुत्रीघर अत्यंत दयनीय अवस्थेत असून त्या परिसरात कचरा परिपूर्ण वाढलेला असून त्या मुत्री घराची रंगरंगोटी करणे महत्त्वाची असून याबाबतीत पत्रकार संजीव भांबोरे यांनी आज दिनांक ८सप्टेंबर २०२६ ला दूरध्वनीवरून संपर्क केला असता सदर पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की हे मुत्रीघर जीर्ण झाले असून त्याकरिता जिल्हा परिषद फंडातून ५ लाख निधी मंजूर झाले.
असल्याचे सदर प्रतिनिधीशी बोलताना सांगितले व येत्या ८ दिवसात प्रत्यक्षात कामाला सुरुवात करणार असल्याचे यावेळी पत्रकार संजीव भांबोरे यांच्याशी दूरध्वनी वरून बोलताना सांगितले. यावेळी गावातील सामाजिक कार्यकर्ते अमोल उराडे यांनी रात्री ७ सप्टेंबर 2026 ला ८ वाजून १४ मिनिटांनी व्हाट्सअप वर मेसेज करून समस्या अवगत करण्याचे सांगितले होते. त्याचप्रमाणे बस स्टॉप परिसरातील मुत्रीघर समस्या जे ग्रामसभेला जमले नाही ते तुम्ही करून दाखवले अशाप्रकारे मेसेज सुद्धा त्यांनी व्हाट्सअप वर पाठविले.
0 Response to "अड्याळ येथील गुजरी चौकातील मुत्री घराकरता जिल्हा परिषद फंडातून ५ लाख रुपये मंजूर- सरपंच शिवशंकर मुंगाटे."
एक टिप्पणी भेजें