-->
साकोली हायवेवर भीषण अपघात ; नऊ जण ठार ; ११ गंभीर.

साकोली हायवेवर भीषण अपघात ; नऊ जण ठार ; ११ गंभीर.


• साकोली व लाखनी पोलीसांची घटनास्थळी धाव • सर्व कामगार छत्तीसगडचे • जखमींमध्ये महिला व मुले.


         संजीव भांबोरे 
"साप्ताहिक जनता की आवाज"

भंडारा :- साकोली येथे ११ सप्टेंबर : आज पहाटे ०३:३० दरम्यान साकोली जवळील मुंडीपार पेट्रोल पंप समोर ट्रक व ट्रॅक्सच्या भीषण अपघातात छत्तीसगड येथील ९ मजूरांचा घटनास्थळी दुर्दैवी मृत्यू झाला तर ११ जण गंभीर जखमी झाले. ही माहिती मिळताच साकोली व लाखनी पोलीसांनी तेथे धाव घेऊन इतर जखमींना साकोली उपजिल्हा रुग्णालय व भंडारा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. गडेगाव महामार्ग पोलीस व अशोका टोल प्लाझा साकोलीच्या कर्मचाऱ्यांनी या अपघाताने जाम झालेली राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली.
 
सविस्तर की, आज पहाटे ०३:३० दरम्यान मुंडीपार जवळील पेट्रोल पंपाहून डिझेल भरून युपी ७२ बीटी ७९७४ हा ट्रक रोडवर येताच रायपूरहून नागपुरला जाणारी भरधाव एम एच ४९ यु ९८१० ही ( क्लुझर ) ट्रॅक्स ट्रकला आदळली. यात घटनास्थळी छत्तीसगड येथील ९ मजूरांचा जागीच मृत्यू झाला. तर यात ११ जण काही लहान मुले व महिलांसह गंभीर जखमी झाले. ही बाब कळताच लाखनी पोलीस व साकोली पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना साकोली व भंडारा रूग्णालयात हलविले.
 मृतांची नावे कळू शकली नाही. तर जखमींमध्ये सर्व छत्तीसगडचे गणेशा पटले २२, गुलशन वर्मा २१, ललिता पटले २६, तन्मय पटले ०४, बाली पटले ४४, खुशी पटले २०, रामकिशोरी पटले ५१, एक वृद्ध व्यक्ती पटले ७०, रामिया पटले ३० वर्ष व इतर मुले मुली सर्व रा. मु. पो बंसीटोला जि. कवर्धा ( छ. ग.) यांचा समावेश आहे. यांचेवर सध्या साकोली व भंडारा रूग्णालयात जिल्हा वैद्यकीय अधीक्षक डॉ. संदीप गजभिये व वैद्यकीय अधीक्षक डॉ. सतिश हुमने यांचे अतीदक्ष निदर्शनात उपचार सुरू आहे. 

ही अत्यंत दुर्दैवी घटना घडताच लाखनी पोलीस निरीक्षक आशिष गजभिये, साकोली पोलीस निरीक्षक महादेव आचरेकर, सहा. पोलीस निरीक्षक अचल कपूर यांच्या मार्गदर्शनात पोलीस नायक संदीप रोकडे, संदीप बावनकुळे, पोलीस हवालदार प्रतिक बोरकर, सुरेश आत्राम, भालचंद्र अंडेल, वासंती बोरकर, प्रतिक वाघाये, सुनील मेश्राम, गुलाब घासले, निलेश रामटेके, राजेश बांते, यांसह गडेगाव महामार्ग पोलीस, टोल प्लाझाचे भेजराव मुंगमोडे आशिक गणवीर यांनी अती तातडीने जखमींना रुग्णालयात हलविले. यानंतर राष्ट्रीय महामार्गवर अपघातग्रस्त अडकलेल्या वाहनांना क्रेनच्या मदतीने बाजूला करीत खोळंबलेली वाहतूक सुरळीत करण्यात आली होती.

0 Response to "साकोली हायवेवर भीषण अपघात ; नऊ जण ठार ; ११ गंभीर. "

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article