-->
नेचर पार्कवर निसर्गमहोत्सव लाखनी निमित्ताने गणेशोत्सवाचे आयोजन.

नेचर पार्कवर निसर्गमहोत्सव लाखनी निमित्ताने गणेशोत्सवाचे आयोजन.



• इको फ्रेंडली गणपती मूर्ती बनवा व निबंध स्पर्धेचे आयोजन.


       संजीव भांबोरे 
"साप्ताहिक जनता की आवाज" 

भंडारा :- लाखनी येथील बसस्थानकावर असलेल्या नेचर पार्कवर ग्रीन नेचर फाउंडेशन तर्फे मागील 22 वर्षाच्या अखंडीत सातत्यपूर्ण कार्यक्रमाप्रमाणे यावर्षी सुद्धा"निसर्गमहोत्सव लाखनीचा" या उपक्रमाअंतर्गत यावर्षीचा पर्यावरणस्नेही गणेशोत्सव नेचर पार्कवर रविवारी साजरा करण्यात आला.

याकार्यक्रमाला ज्येष्ठ नागरिक व सामाजिक कार्यकर्ते भैय्याजी बावनकुळे, नगरपंचायत लाखनीचे क्रियाशील नगरसेवक संदीप भांडारकर, ग्रीन नेचर फाउंडेशनचे पदाधिकारी अशोक वैद्य व अशोक नंदेश्वर तसेच श्रीकांत नंदेश्वर, अमर गायधने हे सर्व यावेळी उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ग्रीन नेचर फाउंडेशन अर्थात ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लब लाखनीचे कार्यवाह प्रा. अशोक गायधने यांनी निसर्गमहोत्सव लाखनीचा अंतर्गत मागील 22 वर्षापासून होणारे कार्यक्रम, वर्षभराचे 15 कार्यक्रम व 30 निःशुल्क स्पर्धा याची माहिती त्यांनी विद्यार्थ्यांना दिली. तर अध्यक्ष अशोक वैद्य यांनी नेचर पार्कवर क्रियाशील नगरपंचायत सदस्य संदीप भांडारकर यांच्या सहकार्याने गणेश विसर्जन कुंड , निर्माल्य संकलन मोहिमेची माहिती उपस्थिताना दिली.

सर्वच प्रमुख अतिथीनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव निमित्ताने समायोचित मार्गदर्शन केले.
यावेळी तीन स्पर्धांचे आयोजन निसर्गमहोत्सव लाखनीचा निमित्ताने नेचर पार्कवर करण्यात आले.पर्यावरणस्नेही गणेश मुर्ती बनवा स्पर्धामध्ये प्रथम क्रमांक प्राथमिक गटात सान्वि राजू गायधनी हिला प्रथम क्रमांक तर हायस्कूल गटात प्रथम क्रमांक कृणाली बोपचे तर द्वितीय क्रमांक श्रेया नंदेश्वर व आराध्या बोपचे यांना तर ज्युनिअर गटात श्रध्दा नंदेश्वर हिचा प्रथम क्रमांक तर प्रोत्साहनपर क्रमांक आरुषी नान्हे व दिक्षा चेटूले तर मिडलस्कूल गटात प्रथम क्रमांक पार्थ गायधनी तर द्वितीय क्रमांक आराध्या आगलावे हिला प्राप्त झाला.प्रोत्साहनपर क्रमांक हर्षिता बोपचे हिला प्राप्त झाला.
गणेश मूर्तीजवळ पर्यावरणस्नेही देखावा करायचे स्पर्धेत प्रथम क्रमांक सान्हवी राजू गायधनी तर द्वितीय क्रमांक कृणाली संजय बोपचे हिला तर तृतीय क्रमांक आराध्या बोपचे हिला प्राप्त झाला तर प्रोत्साहनपर क्रमांक आरुषी नान्हे, दिक्षा चेटुले यांना प्राप्त झाला.

पर्यावरणस्नेही गणेशोत्सव कसा साजरा करावा यावर आधारीत निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक श्रध्दा श्रीकांत नंदेश्वर तर द्वितीय क्रमांक आरुषी नान्हे व दिक्षा चेटूले यांना प्राप्त झाला. हायस्कूल गटात प्रथम क्रमांक ऋणाली संजय बोपचे तर द्वितीय क्रमांक आराध्या बोपचे हिला प्राप्त झाला. 
स्पर्धेचे परीक्षण भैय्याजी बावनकुळे व अशोक नंदेश्वर यांनी तर संचालन व आभार प्रदर्शन अशोक वैद्य यांनी केले. कार्यक्रमासाठी डॉ. मनोज आगलावे, डॉ . प्रमोद देशमुख,डॉ. छगन राखडे, डॉ. योगेश गिऱ्हेपुंजे, कोनगाव पोलिस स्टेशन मुंबईचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नेताराम मस्के , प्राचार्य अशोक हलमारे, भूपेंद्र निर्वाण,रमेश गभणे इत्यादींनी अथक परिश्रम घेतले.

0 Response to "नेचर पार्कवर निसर्गमहोत्सव लाखनी निमित्ताने गणेशोत्सवाचे आयोजन."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article