-->
तुमसर-मोहाडीसह चार तालुक्यांचा समावेश करा

तुमसर-मोहाडीसह चार तालुक्यांचा समावेश करा



• आमदार राजू कारेमोरे यांची मुख्यमंत्र्यांसह कृषिमंत्र्यांकडे मागणी.

   दिगंबर देशभ्रतार
 साप्ताहिक"जनता की आवाज" 
भंडारा/तुमसर :- राज्य शासनाने २५ सप्टेंबरला जाहीर केलेल्या दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत भंडारा जिल्ह्यातील तुमसर, मोहाडी, साकोली आणि लाखनी या चार तालुक्यांचा समावेश करण्यात आलेला नाही. या चारही तालुक्यांचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी तुमसर-मोहाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजू कारेमोरे यांनी केली आहे.
मदत व पुनर्वसन विभागाच्या शासन निर्णयानुसार राज्यातील २६५ तालुके दुष्काळग्रस्त म्हणून घोषित करण्यात आले आहेत. दुष्काळग्रस्त तालुके निश्चित करण्यासाठी शासनाने पर्जन्यमानासह विविध निकषांचा आधार घेतला आहे. मात्र, भंडारा जिल्ह्यातील चार तालुके यामधून वगळण्यात आल्याने

स्थानिक शेतकरी वर्गात प्रश्न उपस्थित होत असल्याचे आमदार कारेमोरे यांनी म्हटले आहे. शासकीय आकडेवारीनुसार तुमसर तालुक्यात ७५.५५ टक्के तर मोहाडी तालुक्यात ८१.९३ टक्के पर्जन्यमान झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. मात्र प्रत्यक्ष परिस्थितीत पावसामध्ये मोठे खंड पडले असून अपेक्षित दमदार पाऊस झाला नसल्याचा दावा आमदार कारेमोरे यांनी केला आहे. त्यामुळे केवळ पर्जन्यमानाच्या आकडेवारीवर आधारित निर्णय न घेता प्रत्यक्ष

शेतातील परिस्थिती, पिकांची अवस्था आणि जलसाठ्याची स्थिती विचारात घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. शासनाकडून अपेक्षित निर्णय न झाल्यास शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशाराही आमदार कारेमोरे यांनी दिला आहे. प्रत्यक्ष पीक परिस्थितीचा आढावा घेऊन भंडारा जिल्ह्यातील शेतकयांना न्याय देण्यासाठी शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

0 Response to "तुमसर-मोहाडीसह चार तालुक्यांचा समावेश करा"

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article