आजच्या तरुणाईवर पडलेली मोबाईलची भुरळ - एक आत्मचिंतन.
रविवार, 20 सितंबर 2026
Comment
• मोबाईल साधन आहे, साध्य नाही - महंत श्री गोपालव्यास कपाटे..
संकलन/संग्रहक हर्षवर्धन देशभ्रतार
आजचा तरुण हा हातात जग घेऊन फिरतोय, पण मनातलं जग हरवून बसलाय. मोबाईल ज्याने जग जवळ आणलं, त्यानेच माणसाला माणसापासून दूर केलं. सकाळी डोळे उघडल्यापासून रात्री झोपेपर्यंत स्क्रीनवर बोटं फिरत आहेत. नोटिफिकेशनची घंटी वाजली की जीवाची घालमेल होते. ही भुरळ आहे, व्यसन आहे, आणि हळूहळू गुलामी बनत चालली आहे.
१. भुरळ कशी पडते?
तरुणाईला वाटतं मी कनेक्टेड आहे. खरं तर तो कनेक्टेड नाही, तो अडकलेला आहे.
तुलनेचा सापळा इंस्टाग्रामवर दुसऱ्याचं चकचकीत आयुष्य पाहून स्वतःव्या आयुष्याचा तिरस्कार वाटू लागतो.
फोमो (FOMO) - काहीतरी मिस होईल ही भीती.
झटपट मनोरंजन रील्स 30 सेकंदात हसवतात, पण ३ तास खाऊन टाकतात.
66 मोबाईल हा साधन आहे, ती साध्य नाही. जर तो नातेसंबंध बिघडवत असेल तर त्याचा वापर संयम गरजेचा आहे.
धर्म म्हणाजे केवळ पूजापाठ नव्हे, तर घरात सत्य आणि प्रामाणिकपणाचं आचरण आहे. मोबाईल हा साधन आहे, तो साध्य नाही. तरुणांनो, तुमच्या हातात असलेला मोबाईल तुम्हाला जग जिंकण्यासाठी दिलाय, स्वतःला हरवण्यासाठी नाही. स्क्रीन खाली ठेवा, समोर बघा आई-बाबा वाट पाहत आहेत, स्वनं वाट पाहत आहेत, आणि खरं आयुष्य वाट पाहत आहे. मोबाईल-मुत्तत्त वेळ हीच खरी कुटुंबाला जोडणारी वेळ आहे.
२. काय गमावतोय आपण?
अ) आरोग्य मान दुखते, डोळे जळतात, झोप उडाली आहे. रात्री २ वाजेषर्यंत स्क्रोल करणारा तरुण सकाळी ८ वाजता थकलेला उठतो.
ब) नाती : एकाच घरात चार माणसं, चार वेगवेगळ्या स्क्रीनमध्ये. आई-बाबांशी १० मिनिटं बोलायला वेळ नाही, पण अनोळखी व्यक्तीच्या स्टोरीवर तासभर चर्चा.
क) करिअर आणि एकाग्रता : अभ्यास
करताना दर ५ मिनिटाला मोबाईल चेक. पुस्तकाची ९० पानं वाचणं कठीण झालंय, कारण मेंदूला आता १५ सेकंदापेक्षा जास्त एका ठिकाणी टिकता येत नाही. स्वमं मोठी आहेत, पण प्रयत्न मोबाईलमध्ये अडकलेले.
३) उपाय काय? जानं कसं व्हायचं?
प्रवीदिवस २ तास नो मोबाईल झोन.
नोटिफिकेशन बंद मन शांत.
मित्राला भेटा, क्षण जगा.
आठवड्यातून एक दिवस डिजिटल उपवास.
धर्मबोध
हा लेख 'धर्मबोध' साठी विशेष लिहिला आहे. आपल्या शाळा, समाजमंदिर, ग्रामसभेत 'डिजिटल शिस्त आणि कुटुंब संवाद' या विषयावर चर्चा जरूर घडवून आणावी.
अग्रलेखक
महंत श्री गोपालव्यास कपाटे,
उरळीकांचन पुणे
0 Response to "आजच्या तरुणाईवर पडलेली मोबाईलची भुरळ - एक आत्मचिंतन."
एक टिप्पणी भेजें