भरधाव वाहनाच्या धडकेत चितळ जागीच ठार !.
मंगलवार, 15 सितंबर 2026
Comment
• अर्जुनी मोरगाव वनपरिक्षेत्रातील घटना.
युगांतर बारसागडे
"साप्ताहिक जनता की आवाज"
अर्जुनी मोरगाव :- अर्जुनी मोरगाव वनक्षेत्रातंर्गत येणाऱ्या तावशी-संभाजीनगर महामार्गावर रस्ता ओलांडत असताना अज्ञात वाहनाच्या धडकेत चितळाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज, रविवार १३ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता सुमारासची आहे. या घटनेमुळे महामार्गावरील वन्यजीवांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
अर्जुनी मोरगाव तालुका वनसंपदेने नटलेला आहे. या ठिकाणी विविध प्रजातीचे पशु पक्षी आढळून येतात. अनेक मार्ग वनक्षेत्रातून जात असल्याने वन्यप्राण्यांच्या अपघाताच्या घटना सतत समोर येत असतात. अशातच आज, तावशी संभाजीनगर मार्गावर रस्ता ओलांडत असलेल्या चितळाला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या धडकेत चितळाचा जागीच मृत्यू झाला. मृत चितळ
अंदाजे ४ ते ५ वर्ष वयाचा होता. घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन मृत चितळाचा पंचनामा केला व नियमानुसार पुढील वनवैधानिक कारवाई सुरू केली. या भागात वन्यप्राण्यांची नेहमीच वर्दळ असल्याने वन्यप्राण्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पुढील तपास वनपरिक्षेत्राधिकारी बहुरे यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक परशुरामकर, सतीश शेंदरे, रविंद्र सांतवार तसेच वनमजूर दिलीप डोंगरवार करीत आहेत.
0 Response to "भरधाव वाहनाच्या धडकेत चितळ जागीच ठार !."
एक टिप्पणी भेजें