-->
आकाशात उगवला भीम तारा.. (काव्य फुले )

आकाशात उगवला भीम तारा.. (काव्य फुले )




संकलन :- प्रदिप कडबे 

आकाशात उगवला बघा भीम तारा 
वाहतो जगी मंद मंद वारा 
उजळून निघाली मंद प्रकाशात धरा 
वंचिताचे जीवनी आनंद मिळाला खरा=१=

पहाट झाली सूर्य उगवला 
अवनी वरी महामानव भीम जन्मला 
सनई चौघडा तुतारीचा निनाद झाला 
रंजल्या गांजल्या जनांच्या जीवनी प्रकाश मिळाला=२=

गावोगावी घरोघरी अंगणी 
करून सडा सारवण 
दरवाज्याना लावून तोरण 
स्वागत केले भीम जन्माचे निळे झेंडे लावून=३=

रविकर आला नभात गुलाल उधळीत 
निशा संपून पहाट झाली 
दीनदुबळ्या पद दलितांच्या जीवनात 
नव्या युगाची झाली सुरुवात=४=


    कवी - नागनाथ डोलारे, पनवेल

0 Response to "आकाशात उगवला भीम तारा.. (काव्य फुले )"

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article