-->
🌺 श्रीकृष्ण अवतरणदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!.. 🌺

🌺 श्रीकृष्ण अवतरणदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!.. 🌺



संकलन/संग्रहक :- हर्षवर्धन देशभ्रतार 

अधर्माच्या अंधःकाराला छेदून धर्माचा दीप प्रज्वलित करण्यासाठी, भक्तांच्या हृदयात प्रेम, करुणा आणि विश्वास जागविण्यासाठी अवतरलेल्या भगवान श्रीकृष्ण भगवंतांच्या पावन अवतरणदिनानिमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा! 🙏🪷

श्रीकृष्ण भगवंतांच्या बाललीलांतील निरागसता, त्यांच्या सख्यभावातील प्रेम, गोपीजनांवरील भक्तीमय अनुराग, दुष्टांच्या संहारातील निर्भयता आणि कुरुक्षेत्रावर अर्जुनाला दिलेल्या श्रीमद्भगवद्गीतेच्या अमर उपदेशातील जीवनदृष्टी—या प्रत्येक लीलेत आणि प्रत्येक शब्दात मानवी जीवनाला दिशा देणारे गूढ तत्त्वज्ञान सामावलेले आहे.

केवळ श्रीकृष्ण भगवंतांचे स्मरण करण्यात नव्हे, तर त्यांच्या चरित्राचे चिंतन करून त्यांचा उपदेश आचरणात आणण्यातच या पावन दिवसाचे खरे सार्थक आहे.

कर्तव्य करताना फलाची आसक्ती सोडावी, संकटसमयी धैर्य न सोडावे, सत्य व धर्माची कास धरावी, सुख-दुःखात समत्व राखावे आणि प्रत्येक जीवामध्ये परमात्म्याचे अस्तित्व अनुभवावे—हीच श्रीकृष्ण भगवंतांच्या चरणी खरी भक्ती.

या अवतरणदिनाच्या निमित्ताने आपल्या अंतःकरणातील अज्ञानाचा अंधःकार दूर होवो, विवेकाचा प्रकाश प्रज्वलित होवो आणि श्रीकृष्णांच्या दिव्य लीलांचे चिंतन व श्रीमद्भगवद्गीतेचा उपदेश आपल्या विचारांत, व्यवहारांत आणि आचरणांत उतरविण्याची प्रेरणा प्रत्येकाला लाभो.

“श्रीकृष्ण भगवंतांच्या श्राचरणी श्रद्धा, हृदयात प्रेम, कर्मात धर्म आणि जीवनात श्रीमद्भगवद्गीतेचा संदेश”.
याहून सुंदर कृष्णभक्ती दुसरी कोणती?.. 🪷🙏

🌸 जय श्रीकृष्ण!..🌸
   श्रीकृष्णार्पणमस्तु!.

महात्मा श्रीगोपाल कपाटे, निमोण
श्री ब्रह्मविद्या संशोधन आणि संपादन.

0 Response to "🌺 श्रीकृष्ण अवतरणदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!.. 🌺"

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article