-->
गुणपत्रिका वितरण समारंभ संपन्न, ग्रंथपालन प्रमाणपत्र परीक्षा 2026 चा निकाल जाहीर.

गुणपत्रिका वितरण समारंभ संपन्न, ग्रंथपालन प्रमाणपत्र परीक्षा 2026 चा निकाल जाहीर.


सदानंद मोरे (जि.प्र.)
साप्ताहिक"जनता की आवाज" 

अकोला :- ग्रंथालय संचालनालय, म. राज्य,मुंबई यांचे मार्फत जून २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या ग्रंथपालन प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला.
या परीक्षेत अकोला केंद्राचा निकाल ७० टक्के लागला असून कु.हर्षदा इंदाने या विद्यार्थिनी ने अकोला केंद्रामधून 68% गुण घेऊन प्रथम क्रमांक पटकाविल्याबद्दल जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय अकोला येथे तिचा प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन जिल्हा ग्रंथालय अधिकारी डॉ.अतुलजी वानखडे यांचे हस्ते भावपूर्ण सत्कार करण्यात आला. तसेच ग्रंथ मित्र रामेश्वर पोहेकर यांना भंडारा जिल्ह्यातील पहेला येथील नामांकित संस्थेतर्फे 2026 चा अकोला जिल्हा ग्रंथालय भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन भावपूर्ण सत्कार करण्यात आला.

 त्यानंतर सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांना गुणपत्रिका देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी अमरावती विभाग ग्रंथालय संघाचे अध्यक्ष श्री. प्रभाकर घुगे, अकोला जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष श्री. शामराव वाहुरवाघ, ग्रंथमित्र श्री. रामभाऊ मुळे, यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. या साठी जिल्हा ग्रंथालय संघाचे कार्यवाह श्री. समाधान इंगळे, शरद लोखंडे यांनी परीश्रम घेतले.

0 Response to "गुणपत्रिका वितरण समारंभ संपन्न, ग्रंथपालन प्रमाणपत्र परीक्षा 2026 चा निकाल जाहीर."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article