दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया. चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.राजरत्न आंबेडकर 31 ऑक्टोबरला भंडारा जिल्हा दौऱ्यावर...
शुक्रवार, 23 अक्टूबर 2026
Comment
संजीव भांबोरे
"साप्ताहिक "जनता की आवाज"
भंडारा :- जिल्ह्यातील सर्व भिक्खु संघ ,धम्मगुरु, जिल्हा पदाधिकारी, तालुका पदाधिकारी तथा बौद्ध उपासक/ उपासिका व आजी / माजी पदाधिकारी यांना आवाहन करण्यात येत आहे की ,
दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया (संस्थापक डॉ.बाबसाहेब आंबेडकर) चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. राजरत्न अशोकराव आंबेडकर भारतीय बौद्धांची स्वतंत्र आर्थिक चळवळ व बँक,हॉस्पिटल,विद्यापिठ, मिडिया,छापखाने, विहारे, निर्माण करून बौद्ध धम्माचा प्रचार प्रसार करणे या बाबासाहेबांनी दिलेल्या उद्दिष्टांची अमलबजावणी करण्याबाबद खालील विहारांना भेटी देण्यान येत आहे.
सकाळी 11.30 वा. विश्रामगृह भंडारा येथे आगमन.
दुपारी 1.00 वा.- श्रद्धाभूमी बुद्धविहार शहापूर, जवाहर नगर,
दुपारी 2.00 वा. रमाई बुद्ध विहार रमाई वार्ड भंडारा व मैत्री बुद्धविहार नाशिकनगर, विहारांना भेटी व थोडक्यात मार्गदर्शन.
सायं. 4.00 वा. महाप्रज्ञा बुद्धविहार लाखणी येथील विहाराला भेट व थोडक्यात मार्गदर्शन
सायं. 5.00 वा. :- डॉ. बाबसाहेब आंबेडकर तालुका स्मारक समिती साकोली येथील विहाराला भेट व थोडक्यात मार्गदर्शन
भंडारा जिल्हा दौरा समाप्त झाल्यानंतर सौंदड मार्गे गोंदिया जिल्ह्याकडे प्रस्थान करणार आहेत.
करिता उपासकांनी सदर विहारामध्ये उपस्थित राहण्याचे आवाहन विभागीय अध्यक्ष मा.विजय बनसोड, जिल्हा अध्यक्ष डॉ.प्रविन थुलकर व महासचिव मनोज बन्सोड यांनी केलेले केले.
0 Response to "दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया. चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.राजरत्न आंबेडकर 31 ऑक्टोबरला भंडारा जिल्हा दौऱ्यावर..."
एक टिप्पणी भेजें