भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील अड्याळ येथे दमा औषधीचा 5000 महिला, पुरुष, युवक, युवती यांनी घेतला लाभ.
सोमवार, 26 अक्टूबर 2026
Comment
दरवर्षी कोजागिरी ( शरद) पौर्णिमेनिमित्त वाटप केले जाते औषधी.
संजीव भांबोरे
"साप्ताहिक "जनता की आवाज"
भंडारा :- पवनी तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या अड्याळ येथे हनुमान पंच कमिटीच्या वतीने दरवर्षी कोजागिरी पौर्णिमेनिमित्त दमा औषधाचे वितरण केले जाते.
या दमा औषधाचा लाभ घेण्याकरिता विदर्भातील मोठ्या संख्येने नागरिक येत असतात. यावेळी सुद्धा जवळपास 5000 महिला, पुरुष, युवक,युवती यांनी दमा औषधीचा लाभ घेतला. यावेळी अड्याळ येथील ठाणेदार सचिन तायवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या चोख बंदोबस्त होता.
0 Response to "भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील अड्याळ येथे दमा औषधीचा 5000 महिला, पुरुष, युवक, युवती यांनी घेतला लाभ."
एक टिप्पणी भेजें