-->
पिपरी पुनर्वसन येथे बहुजन नायक मान्यवर कांशीरामजी यांना अभिवादन.......

पिपरी पुनर्वसन येथे बहुजन नायक मान्यवर कांशीरामजी यांना अभिवादन.......

• डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती व एस. चवळे करिअर अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने अभिवादन सभेचे आयोजन.

     देवानंद नंदागवळी 
 साप्ताहिक"जनता की आवाज"
 
भंडारा/पिपरी पुनर्वसन :- फुले-शाहू-आंबेडकरी विचारांचा वारसा पुढे नेत बहुजन समाजामध्ये स्वाभिमान आणि आत्मविश्वासाची ज्योत प्रज्वलित करणारे, तसेच सामाजिक, राजकीय व वैचारिक चळवळीला नवी दिशा देणारे बहुजन नायक मान्यवर कांशीरामजी यांच्या स्मृतिदिनानिमित्त पिपरी पुनर्वसन येथे अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते.
 डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, पिपरी आणि एस. चवळे करिअर अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम पार पडला.
वंचित, शोषित आणि उपेक्षित बहुजन समाजाला संघटित करून त्यांच्यामध्ये सामाजिक व राजकीय जाणीव निर्माण करण्यासाठी कांशीरामजी यांनी देशभर भ्रमण केले. त्यांच्या कार्यामुळे बहुजन समाजाच्या चळवळीला नवी दिशा मिळाली. बामसेफ, डीएस-फोर आणि बहुजन समाज पार्टी (बसपा) या संघटनांच्या माध्यमातून त्यांनी बहुजन समाजाच्या हक्कांसाठी व्यापक चळवळ उभी केली. त्यामुळे ते बहुजन समाजाच्या हृदयातील मान्यवर नेते म्हणून ओळखले जातात.

या प्रसंगी पिपरी पुनर्वसन येथील बहुजन नायक मान्यवर कांशीरामजी यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला एस. चवळे करिअर अकॅडमीचे संस्थापक अशोक चवळे, अकॅडमीचे संचालक प्रफुल्ल कातोरे, माजी सरपंच नाशिक चवरे आणि ग्रामपंचायत सदस्या संगीता लांडगे यांच्या हस्ते माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी माजी सरपंच नाशिक चवरे यांनी मान्यवर कांशीरामजी यांच्या सामाजिक व राजकीय जीवनकार्यावर प्रकाश टाकला. त्यांच्या मानवतावादी कार्याचा गौरव करताना, कांशीरामजी यांचे विचार आणि कार्य आजच्या समाजासाठीही प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.

या अभिवादन सभेला पिपरी येथील तसेच परिसरातील भीम अनुयायी आणि एस. चवळे करिअर अकॅडमीचे प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी मान्यवर कांशीरामजी यांच्या स्मृतींना अभिवादन करून त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प व्यक्त केला.

0 Response to "पिपरी पुनर्वसन येथे बहुजन नायक मान्यवर कांशीरामजी यांना अभिवादन......."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article