भाजपचे सुधाकर कोहळेंची आघाडी, पण नागपूर पदवीधरचा 'अंतिम फैसला' ठरणार दुसऱ्या पसंतीच्या गणितावर.
बुधवार, 28 अक्टूबर 2026
Comment
• विधान परिषदेच्या ५ जागांसाठी मतमोजणी सुरू आहे.
साप्ताहिक "जनता की आवाज"
न्यूज नेटवर्क
नागपूर :- अमरावती, छत्रपती संभाजीनगरमधील या काट्याच्या टक्करमध्ये महायुती बाजी मारणार की महाविकास आघाडी बाजी पलटवणार?..
नागपूर पदवीधर : भाजपचे सुधाकर कोहळेंची आघाडी, पण नागपूर पदवीधरचा 'अंतिम फैसला' ठरणार दुसऱ्या पसंतीच्या गणितावर
नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत
विजयाचा सस्पेन्स अधिकच वाढला आहे. दुसऱ्या फेरीअखेर भाजपचे सुधाकर कोहळे यांनी ४,२९४ मतांची आघाडी घेतली असली, तरी कोणत्याही उमेदवाराला विजयासाठी आवश्यक असलेला ७५,४३८ मतांचा 'कोटा' गाठता आलेला नाही. त्यामुळे आता दुसऱ्या पसंतीक्रमाच्या मतांची मोजणी सुरू करण्यात आली आहे.
अधिकृत दुसऱ्या फेरीअखेर भाजपचे सुधाकर कोहळे यांना ६०,९२४ मते, तर काँग्रेसचे अभिजीत वंजारी यांना ५६,६३० मते मिळाली आहेत. अपक्ष उमेदवार नितेश कराळे २४,२४९ मतांसह तिसऱ्या स्थानावर आहेत. मतमोजणीत एकूण १ लाख ५० हजार ८७४ मते वैध ठरली असून तब्बल १५,१०६ मते अवैध ठरली आहेत. दरम्यान, या अवैध मतांची पुन्हा मोजणी करावी, अशी मागणी भाजपचे उमेदवार सुधाकर कोहळे यांनी केली.
0 Response to "भाजपचे सुधाकर कोहळेंची आघाडी, पण नागपूर पदवीधरचा 'अंतिम फैसला' ठरणार दुसऱ्या पसंतीच्या गणितावर."
एक टिप्पणी भेजें