-->
डॉ. राजरत्न आंबेडकरांचा ३१ ऑक्टोबरला भंडारा जिल्हा दौरा.

डॉ. राजरत्न आंबेडकरांचा ३१ ऑक्टोबरला भंडारा जिल्हा दौरा.


• स्वतंत्र आर्थिक चळवळ व बौद्ध धम्म प्रचारावर राहणार भर.

साप्ताहिक "जनता की आवाज"
       वृत्तपत्र प्रतिनिधी 

भंडारा :- 'दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया'चे (संस्थापकः महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर) राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय डॉ. राजरत्न अशोकराव आंबेडकर आगामी ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. बाबासाहेबांच्या विचारांची आणि त्यांनी दिलेली उद्दिष्टे प्रत्यक्षात आणण्यासाठी हा दौरा अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जात आहे.

भारतीय बौद्धांमध्ये स्वतंत्र आर्थिक चळवळ उभी करणे, तसेच बँक, हॉस्पिटल्स, विद्यापीठे, मीडिया, छापील माध्यमे आणि विहारांची निर्मिती करून त्या माध्यमातून बौद्ध धम्माचा प्रभावी प्रचार व प्रसार करणे या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नांची अंमलबजावणी करणे हा या दौरामागील प्रमुख उद्देश आहे.

याद्वारे समाजसंघटन आणि आर्थिक स्वावलंबनावर भर दिला जाणार आहे. दौऱ्याचे सविस्तर वेळापत्रक सकाळी ११:३० वाजताः शासकीय विश्रामगृह, भंडारा येथे आगमन. दुपारी १:०० वाजताः श्रद्धाभूमी बुद्धविहार, शहापूर (जवाहर नगर) भेट. दुपारी २:०० वाजताः रमाई बुद्ध विहार (रमाई वार्ड, भंडारा)

व मैत्री बुद्धविहार (नाशिकनगर, भंडारा) यांना सदिच्छा भेट व अल्प मार्गदर्शन. सायंकाळी ४:०० वाजताः महाप्रज्ञा बुद्धविहार, लाखणी येथे भेट व मार्गदर्शन. सायंकाळी ५:०० वाजताः डॉ. बाबासाहेब आंबेडकर तालुका स्मारक समिती, साकोली येथील विहाराला भेट व मार्गदर्शन. साकोली येथील कार्यक्रम संपल्यानंतर डॉ. राजरत्न आंबेडकर सौंदड मार्गे पुढील प्रवासासाठी गोंदिया जिल्ह्याकडे प्रस्थान करतील.

भंडारा जिल्ह्यातील सर्व आदरणीय भिक्खू संघ, धम्मगुरू, जिल्हा व तालुका पदाधिकारी, आजी-माजी पदाधिकारी तसेच सर्व बौद्ध उपासक व उपासिकांनी या दौदरम्यान संबंधित बुद्धविहारामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन 'दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया'चे जिल्हाध्यक्ष डॉ. प्रवीण थुलकर आणि महासचिव मनोज बन्सोड यांनी केले आहे.

0 Response to "डॉ. राजरत्न आंबेडकरांचा ३१ ऑक्टोबरला भंडारा जिल्हा दौरा."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article