-->
प्रबुद्ध त्रिरत्न विहारात 'बुद्धांचा उपदेश' पुस्तकाचे वितरण.

प्रबुद्ध त्रिरत्न विहारात 'बुद्धांचा उपदेश' पुस्तकाचे वितरण.


• विद्यार्थ्यांनी बुद्धांच्या रून समाजाच्या प्रगतीत योगदान द्यावे : भंते डॉ. चंद्रकीर्ती.

       हर्षवर्धन देशभ्रतार 
साप्ताहिक जनता की आवाज 

भंडारा/पिपरी (पुनर्वसन) :- दि. १५ आक्टोंबर येथील प्रबुद्ध त्रिरत्न विहारात महिला सशक्तिकरण संघ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या संयुक्त विद्यमाने 'बुद्धांचा उपदेश' या मौलिक पुस्तक वितरणाचा विशेष कार्यक्रम उत्साहात पार पडला. 

         पुस्तकांच वितरण करतांना भंते डॉ.चंद्रकीर्ती 
 
या वेळी जपान येथील महाउपासिका रूमी यांच्या प्रमुख उपस्थितीत महिला सशक्तिकरण संघाचे संस्थापक अध्यक्ष भंते डॉ. चंद्रकीर्ती यांच्या हस्ते एस. चवळे करिअर अकॅडमीच्या प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना, बुद्ध अनुयायांना तसेच ग्रामस्थांना पुस्तकांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमात मार्गदर्शन करताना महाउपासिका रूमी म्हणाल्या की,
.            मार्गदर्शन करतांना महाउपासिका रुमी.

"भगवान गौतम बुद्धांचा धम्म हा केवळ उपासनेपुरता किंवा विधीपुरता मर्यादित नसून, तो मानवतेचा, समतेचा, करुणेचा आणि प्रज्ञेचा कल्याणकारी मार्ग आहे." बुद्धांचे विचार दैनंदिन जीवनात आचरणात आणण्याचे आवाहन त्यांनी या वेळी केले. कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक भंते डॉ. चंद्रकीर्ती यांनी आपल्या प्रबोधनात सांगितले की, "शिक्षण हे सामाजिक परिवर्तनाचे सर्वात प्रभावी साधन आहे. विद्यार्थ्यांनी शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य देऊन आपले भविष्य उज्ज्वल घडवावे. तसेच बुद्धांच्या समतावादी व वैज्ञानिक विचारांचा अंगीकार करून समाजाच्या सर्वांगीण प्रगतीत सक्रिय योगदान द्यावे."

शिक्षण आणि बुद्ध विचारांचा प्रसार एकत्र साधणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या भावी वाटचालीसाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमाला महाउपासिका आदरणीय रूमी, भंते डॉ. चंद्रकीर्ती यांच्यासह पुरुषोत्तम शहारे, प्रिया शहारे आणि मिरज पुरी यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुसूत्र संचालन नाशिक चवरे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार नितीन मेश्राम यांनी मानले. बुद्ध विचारांचा प्रसार, शैक्षणिक प्रोत्साहन आणि सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या या स्तुत्य उपक्रमाचे परिसरात सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

0 Response to "प्रबुद्ध त्रिरत्न विहारात 'बुद्धांचा उपदेश' पुस्तकाचे वितरण."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article