अल्पवयीन मुलीच्या विनयभंगप्रकरणी सराईत गुन्हेगार अटकेत.
शुक्रवार, 30 अक्टूबर 2026
Comment
नरेंद्र मेश्राम
साप्ताहिक"जनता की आवाज़"
लाखनी :- स्थानिक पोलीस ठाण्याच्या हद्दीत १७ वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी १९ वर्षीय तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करून लाखनी पोलिसांनी काही तासांत बेड्या ठोकल्या. पीयूष दुर्गाप्रसाद मेश्राम (रा. मुरमाडी, ता. लाखनी, जि. भंडारा) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
२८ ऑक्टोबर रोजी रात्री पीडित मुलगी घरी असताना आरोपीने तिचा जबरदस्तीने हात धरून, तू मेरी बीबी है. आज तू मेरे साथ चलेगी, असे म्हणत गैरवर्तन केले. आरोपी काही दिवसांपासून तिला त्रास देत होता. याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून लाखनी पोलीस ठाण्यात बीएनएस
कलमांनुसार आणि पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला. पोलिसांनी २९ ऑक्टोबर रोजी पहाटे आरोपीला अटक केली. आरोपीवर यापूर्वी खुनाचा गंभीर गुन्हा दाखल असून तो काही दिवसांपूर्वीच जामिनावर बाहेर आला होता. साहाय्यक पोलीस निरीक्षक अचल कपूर या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.
0 Response to "अल्पवयीन मुलीच्या विनयभंगप्रकरणी सराईत गुन्हेगार अटकेत."
एक टिप्पणी भेजें