-->
पहेला–आंभोरा रोडच्या मधोमध असलेले विद्युत खांब तात्काळ हटवा — अमोल भुरले.

पहेला–आंभोरा रोडच्या मधोमध असलेले विद्युत खांब तात्काळ हटवा — अमोल भुरले.

संजीव भांबोरे 
साप्ताहिक जनता की आवाज"
  
भंडारा :- पहेला ते आंभोरा रोडच्या मधोमध विद्युत खांब उभे असल्याने वाहनचालक व नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. रस्त्याच्या मधोमध असलेले हे खांब तात्काळ हटवून रस्ता नागरिकांसाठी सुरक्षित व वाहतुकीस योग्य करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अमोल भुरले व अर्पित मेश्राम यांनी केली आहे.

रस्त्याच्या मध्यभागी विद्युत खांब असल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून, विशेषतः रात्रीच्या वेळी वाहनचालकांसाठी मोठा धोका निर्माण होऊ शकतो. नागरिकांच्या जीविताशी संबंधित हा गंभीर विषय असूनही प्रशासनाने याकडे दुर्लक्ष करू नये,अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे.

“रस्ता हा जनतेच्या सुरक्षित वाहतुकीसाठी आहे, खांब उभे करण्यासाठी नाही. प्रशासनाने तातडीने पाहणी करून हे खांब हटवावेत,” अशी मागणी अमोल भुरले सामाजिक कार्यकर्ता, अर्पित मेश्राम पहेला यांनी केली.
या प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी लवकरच भव्य मोर्चा काढण्यात येणार असून,मोर्चाची तारीख व वेळ लवकरच जाहीर करण्यात येईल,अशी माहिती त्यांनी दिली.

0 Response to "पहेला–आंभोरा रोडच्या मधोमध असलेले विद्युत खांब तात्काळ हटवा — अमोल भुरले."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article